ठाणे: ठाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मध्यवर्ती कार्यालयाबाहेर जोरदार धुळवड साजरी करण्यात आली. डीजेच्या संगीताच्या तालावर, नृत्याची व विविध रंगांची उधळण यावेळी करण्यात आली. प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली ठाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते या रंगोत्सवात रंगून गेले होते.
ठाण्याच्या सर्व जनतेला होळीच्या व धुळवडीच्या खुप खुप शुभेच्छा देतो. हे वर्ष आपल्या सगळ्यांना सुखाचे, समृद्धीचे जावो. आपल्या मनातील जो काही राग, लोभ असेल तो जावो अशा शुभेच्छा प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी यावेळी दिल्या.
