ठाणे : जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत महाआरोग्य शिबिराचे आयोजित करणे या योजनेअंतर्गत तालूकास्तरीय आरोग्य शिबिराचे आयोजन प्राथमिक आरोग्य केंद्र शेंद्रूण, तालुका शहापूर येथे आयोजित करण्यात आले होते. या शिबिराकरिता जिल्हास्तरावरून अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भारत मासाळ तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भाग्यश्री सोनपिंपळे उपस्थित होते.
ग्रामीण भागातील रुग्णांना आरोग्य विषय जागृकता निर्माण करण्यासाठी तालूकास्तरीय महाआरोग्य शिबिरात एकूण 762 लाभार्थ्यांनी लाभ दिला गेला. आरोग्य संबंधित माहिती, सेवा रुग्णांना देणे ही खरी गरज आहे अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे यांनी दिली. डॉ. अशोक नांदापूरकर उप संचालक मुंबई मंडळ ठाणे आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, गट विकास अधिकारी पंचायत समिती शहापूर, भास्कर रेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक आरोग्य केंद्र शेंद्रूण येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. रमेश राठोड आणि डॉ. अभिजीत वानखेडे आणि यांच्या सर्व कर्मचारी यांनी सदर शिबिरासाठी मोलाचे योगदान देत शिबिर यशस्वीरित्या संपन्न केले आहे. या शिबिरामध्ये एकूण 762 लाभार्थ्यांनी लाभ घेतला. त्यापैकी स्त्री रुग्ण 28, हृदयरोग 94, अस्थिरोग रुग्ण 27, दंतरोग 34, बालरोग रुग्ण 40, त्वचारोग 39, पोटाचे विकार 31, नाक कान घसा 50, रक्तदाब 200, मधुमेह 94, रक्त लघवी 25, ईसीजी 25, ब्रेस्ट कॅन्सर साठीची मॅमोग्राफी 30 लाभार्थ्यांची करण्यात आली व इतर 45 रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. सदर शिबिराकरिता हृदयरोग तज्ञ डॉ. रोहित बोबडे, न्यूरोलॉजिस्ट डॉ. डॉ दिलराज कडलस, बालरोग तज्ञ डॉ. श्याम राठोड, स्त्रीरोग तज्ञ डॉ. अविनाश बढीये, , नेत्ररोग तज्ञ डॉ. देवयानी बढीये, त्वचारोग तज्ञ डॉ. प्रशांत जावळे, कान नाक घसा तज्ञ डॉ. वैभव किरपण, दंततज्ञ डॉ. वर्षा चव्हाण, अस्थिरोग तज्ञ डॉ. विशाल साळवे, वैद्यकीय अधिकारी डॉ. मानसी गायकवाड, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रूपाली रोडगे, नेत्रचिकित्सा अधिकारी विठ्ठल बडीये, जनरल फिजीशियन डॉ. हिरामण साबळे उपस्थित होते. यावेळी अधिकारी, तालुकास्तरीय समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सहाय्यक, सहाय्यीका, आरोग्य सेवक, सेविका, औषध निर्माण अधिकारी, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी उपस्थित होते.