रमेश औताडे
मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर व मनोज जरांगे पाटील यांची लोकसभेसाठी युती झाली तरीही मी त्यांना यक्तीगत अकोल्यात मदत करणार , कारण ते मला सांगलीत व्यक्तिगत मदत करणार आहेत. आरक्षण, व्यक्तिगत भूमिका व पार्टीची भूमिका असे वेगवेगळे समीकरण असेल असे ओबीसी बहुजन पार्टीचे अध्यक्ष प्रकाश शेंडगे यांनी बुधवारी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
मनोज जरांगे पाटील व प्रकाश आंबेडकर एकत्र येण्याची दाट शक्यता आहे असे आम्हाला वाटत नाही कारण आरक्षणाच्या मुद्द्यावरून प्रकाशआंबेडकर आमच्याच बाजूने असतील असे शेंडगे यांनी यावेळी सांगितले.
बहुजन वर्गाला प्रस्तापित पक्ष फक्त मतदानासाठी वापर करायचे.आता आम्ही पार्टी काढली आल्याने तिकीट वाटपाची फॅक्टरीच आमच्याकडे आहे. त्यामुळे बहुजन वर्गाला आम्ही मोठ्या संख्येने तिकीट देणार आहोत. राज्यभर आम्ही मेळावे घेऊन त्या त्या ठिकाणी आमचे उमेदवार जाहीर करू. बारामतीत आम्ही तगडा उमेदवार देणार आहोत. बारामतीत आम्ही धनपेटी मधून नाही तर मतपेटीतून आमची ताकद दाखवणार असे शेंडगे यावेळी म्हणाले.
प्रकाश आंबेडकर हे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आहेत ते मनोज जरांगे पाटील यांना सहकार्य करणार नाहीत असा विश्वास आम्हाला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आंबेडकर यांना ३० मार्च पर्यंत वेळ मागितली आहे. त्यानंतर आम्ही आमची वंचित बरोबर युती करायची की नाही ते ठरवू असे शेंडगे यांनी सांगितले.