मुंबई : सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात जनजागृती तसेच कला क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या ॲडव्होकेट अरुण नथुजी शिरसाट यांना नुकताच
महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठेचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिरसाट यांना यावेळी पुरस्काराने सन्मानित केले.
हा समाजभूषण पुरस्कार मिळाल्याने मला ऊर्जा मिळाली आहे. ही ऊर्जा घेऊन मी माझे पुढील आयुष्य हे समाज्याच्या हितासाठी जात, धर्म आणि पंथाच्या पलिकडेजाऊन मानवतेच्या दृष्टीकोनातून समर्पित करण्याचे ठरविले आहे. अशी प्रतिक्रीया शिरसाठी यांनी पुरस्कार स्वीकारताना व्यक्त केली.
सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागातर्फे मार्फत महाराष्ट्र राज्य शासनाकडून सामाजिक सांस्कृतिक, शैक्षणिक, कला क्षेत्रात अग्रेसर राहून अतुलनीय कार्य करणाऱ्यांना हा पुरस्कार दिला जातो. शिरसाट हे नवी मुंबईतील वकिली क्षेत्रात कार्यरत आहे. या पुरस्कार सोहळ्यास मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. उपमुख्यमंत्री अजित पवार , गणेशजी नाईक , आमदार मंदाताई म्हात्रे, आमदार संदीपजी नाईक, भाजपा ज़िल्हाध्यक्ष संजीवजी नाईक, खासदार सी व्ही रेड्डी, समाजकल्याण विभागाचे प्रधान सचिव सुमंत भांगे,,उप सचिव रवींद्र शिवाजी गोरवे, कक्ष अधिकारी पाबळे आदी मान्यवर उपस्थित होते.