ठाणे : विहंग प्रतिष्ठान या नेहरुनगर कुर्ला येथील संस्थेच्या वतीने शनिवार, ३० मार्च रोजी काव्यरंगोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. कुर्ला पूर्व येथील नेहरुनगरमधील शां. कृ. पंतवालावलकर माध्यमिक विद्यालयाच्या सभागृहामध्ये सायंकाळी ६ वाजता हा काव्यरंगोत्सव होणार असून आहे. यानिमित्त घेण्यात आलेल्या हास्यकविता स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या १० कवितांचे सादरीकरण काव्यरंगोत्सवात संबंधित कवीद्वारे करण्यात येईल. काव्यरंगोत्सवास लेखिका माधवी कुंटे, कवयित्री लता गुढे, कवयित्री चारुलता काळे, ज्येष्ठ पत्रकार नरेंद्र वाबळे आणि अभिनेत्री मधुरा वेलणकर प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. सूत्रसंचालिका सायली वेलणकर या पाहुण्यांची प्रकट मुलाखत घेणार आहेत. अधिक माहितीसाठी राजीव भांडारे (८१०८४३४८६४), राजश्री कदम (७७३८०५११४७) यांच्याशी संपर्क साधावा.