केंद्रशाळा पोयरे गांगोरामेश्वर  येथे कै.रामचंद्र हरी राणे स्मरणार्थ

ठाणे : जिल्हा परिषद केंद्र शाळा पोयरे गांगोरामेश्वर येथे नुकतेच  मनाचे श्लोक पाठांतर स्पर्धा व ७ वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न झाला. श्री जयवंत राणे यांच्यामार्फत  श्लोक पाठांतर स्पर्धा आयोजित केल्या होत्या तर  शाळेतील विद्यार्थ्यांच्या वतीने ७वी च्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्रीम.भाग्यश्री सांबारी मॅडम व केंद्रप्रमुख श्री नामदेव सावळे सर उपस्थित होते.

शालेय विद्यार्थ्यांमधील लहान गट पहिली ते चौथी यामधून तीन क्रमांक यात प्रथम क्रमांक कु. मैत्री रणजित घाडी द्वितीय क्रमांक ऋतुराज जयदेव करंदीकर तर तृतीय क्रमांक वेदांत दिपक मेस्त्री याचा आला. मोठा गट यात  पाचवी ते सातवी इयत्ताचा सहभाग होता.प्रथम क्रमांक यश सुनील घाडी द्वितीय क्रमांक राधिका संतोष साळसकर तर तृतिय क्रमांक हर्षदा दिपक मेस्त्री हिचा आला.या सर्व गुणी विद्यार्थ्यांना   मान्यवरांच्या उपस्थितीत अभिनंदन करून  कंपास पेटी भेट दिली. तसेच सहभागी सर्व विद्यार्थ्यांना आकर्षक शैक्षणिक साहित्य देऊन अभिनंदन करण्यात आले. अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांनाही शैक्षणिक साहित्य दिले..

इयत्ता ७ वीचा विदयार्थी मोतीराम साळसकर याने शाळेसाठी समई भेट दिली.कु. तेजल घाडी व कु.हर्षदा मेस्त्री या  विद्यार्थ्यांनी त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

प्रमुख पाहुणे म्हणून सौ. भाग्यश्री सांबारी मॅडम यांनीही मुलांना छान मार्गदर्शन केले.केंद्रप्रमुख श्री सावळे सर यांनीही मुलांना मार्गदर्शन केले.वाचनाचे महत्व सांगितले.  वाचाल तर वाचाल,सुसंस्कार याविषयी मार्गदर्शन केले.

अशाच स्पर्धा पुढच्याही वर्षी राणे परिवाराच्या वतीने आपण घेऊया असे श्री जयवंत राणे यांनी आवर्जून सांगितले.याचा सर्व विद्यार्थ्यांना मनस्वी आनंद झाला.तसेच मुलांना खाऊ ही राणे परिवाराच्या वतीने देण्यात आला.

उपशिक्षक श्री उदगीरे सर यांनी शाळेच्या प्रत्येक उपक्रमात पालकांचा सहभाग आवश्यक आहे असे सांगितले. शाळेच्या भविष्यातील उपक्रमासाठी पालकांनी मदत करावी अशीही विनंती केली.शाळेच्या नावाची एक गोलाकार कमान व संपूर्ण शाळा रंगरंगोटी करून बोलक्या भिंती करावयाच्या आहेत यासाठी दात्यानी सढळ हस्ते मदत करावी अशी विनंती केली.

शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.गोसावी मॅडम यांनी आभार व्यक्त केले.सूत्रसंचलन श्री उदगीरे सर यांनी केले.स्वयंसेविका श्रीम मोरजे मॅडम यांनीही कार्यक्रमाला  मोलाचे सहकार्य केले.

याप्रसंगी उपस्थित केंद्रप्रमुख श्री सावळे सर, सौ.भाग्यश्री सांबारी मॅडम,श्री धोंडू हरी राणे,श्री दाजी हरी राणे,सौ.गोसावी मॅडम, श्रीम.मोरजे मॅडम,शाळा व्य. समिती अध्यक्ष श्री रणजित घाडी,उपाध्यक्ष श्रीम.दिव्या मेस्त्री,श्री जयवंत राणे, श्री.सचिन राणे,श्री. दिपक राणे,अंगणवाडी सेविका मालपेकर मॅडम,श्री धोंडू घाडी,सौ.आर्या जयदेव करंदीकर, सौ.मानसी लक्ष्मण घाडी, सौ.जयश्री लक्ष्मण साळसकर, सौ.शारदा संतोष साळसकर, श्रीम.प्रतिक्षा गुणाजी घाडी, सौ.साक्षी सुनिल घाडी आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *