मुंबई : दिवंगत प्रधानमंत्री व्हि .पी. सिंग यांच्या मानवतावादी विचारावर चालणा-या अखिल भारतीय जनता दलाने लोकसभा निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याची घोषणा करत मुंबई मराठी पत्रकार संघ येथे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष के. जे. शिंदे कोनालीकर यांनी १२ उमेदवाराची पहिली यादी जाहीर केली.
महागाई बेरोजगारी, भ्रष्टाचार, खजगीकरण यांना कडाडून विरोध करत इच्छुक उमेदवारांना पक्षातर्फे खंबीर पाठिंबा देवुन निवडणुकीच्या रिंगणात उभे करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पक्ष कुणालाही पाठिंबा न देता जमलेच तर समविचारी राष्ट्रहितासाठी काम करणा-या पक्षांना सोबत घेतून निवडणुक लढवणार असे शिंदे यांनी सांगितले.
यावेळी लातुरचा १२ मताचा सरपंच म्हणून एकेकाळी संपूर्ण भारतात गाजलेले अ.भा. युवा जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष विकास शिंदे कोनाळीकर, अ.भा. महिला जनता दलाच्या प्रदेशाध्यक्षा शितल रोकडे, प्रदेश सचिव अनिताताई स्वामी, पिंपरी चिंचवड शहराध्यक्षा सोनलताई पाटील, अ.भा. चित्रपट जनता दलाच्या पुणे जिल्हाध्यक्षा अभिनेत्री मानसी पाचपुते, सोलापुर जिल्हाध्यक्ष योगेश लोळे, आ भा अपंग जनता दलाचे पुणे जिल्हाध्यक्ष किसनदादा पवार, प्रदेश युवा सचिव माधव मसुरे, राष्ट्रीय सदस्य गोविंद मसुरे, तालुकाध्यक्ष विकास शिंदे पाटील, आणि मदन राठोड अशी १२ उमेदवाराची यादी जाहीर करण्यात आली.