आझाद मैदानात पोलिस व प्रसिद्धी माध्यमांची गर्दी
रमेश औताडे
मुंबई : आम आदमी पार्टीच्या वतीने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ आझाद मैदानात शुक्रवारी निदर्शने करण्यात आली. गुड फ्रायडे ची सुट्टी असूनही निदर्शनास कार्यकर्त्यांची गर्दी झाली नाही. मैदान मोकळेच पडले होते. मात्र प्रसिद्धी माध्यमांचीच गर्दी जास्त होती.
समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आझाद मैदानातील आंदोलनाला आप ने जेवढा प्रतिसाद दिला होता व मी ही आण्णा च्या टोप्या घातल्या होत्या त्या टोप्यांची गर्दीही कमी होती. केजरीवाल यांची अटक चुकीची आहे असे सांगत काही पदाधिकाऱ्यांची भाषणे झाली तीही ऐकण्यास कार्यकर्ते कमी होते.
मुंबई काँगेस च्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी व इतर काही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी मैदानात येऊन निदर्शनास समर्थन दिले. उन्हाचा पारा वाढल्याने भर उन्हात कार्यकर्ते त्रस्त झाले होते. समाजसेवक अण्णा हजारे यांनी अरविंद केजरीवाल यांच्या अटकेबाबत सावध प्रतिक्रिया दिल्याने अण्णा हजारे यांचे समर्थक निदर्शनात दिसत नव्हते. अरविंद केजरीवाल यांच्या अटक पार्श्वभूमीवर निदर्शनास गर्दी होईल म्हणून पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला होता. प्रसिद्धी माध्यमांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.