ठाणे : सह्याद्री प्रतिष्ठानचे महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष आमदार संजय केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सह्याद्री प्रतिष्ठान ठाणे आयोजित तर्फे ‘ठाणे मुक्ती दिन’ मोठ्या उत्साहात ठाणे मध्यवर्ती कारागृहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे यंदाचे वर्ष १० वर्ष होते. या ऐतिहासिक कार्यक्रमाला आमदार निरंजन डावखरे, सह्याद्री प्रतिष्ठान ठाणे जिल्हा अध्यक्ष महेश विनेरकर, प्रशांत आलुगडे, संगीता श्री. सीताराम राणे, परिवहन सदस्य श्री. विकास पाटील, निलेश कोळी, विशाल वाघ, सुरेश कांबळे, हरी मेजर, लालजी यादव व सह्याद्री प्रतिष्ठानचे कार्यकर्ते उपस्थित होते.पोर्तुगीजांनी अनेक हाल येथील जनतेचे केले. पोर्तुगीजांच्या अत्याचाराला जनता कंटाळाली होती. या जाचातून सोडविण्याकरिता त्यांनी बाजीराव पेशवे यांच्याकडे याचना केली असता 27 मार्च 1737 साली चिमाजी अप्पा यांनी एका रात्रीत स्थानिकांच्या मदतीने ठाणे किल्ला पोरतुगीज्यांच्या जोखडीतून सोडविला आणि ठाणे मुक्त केलं. या लढाईत बलकवडे, ढमढरे, अंजूर चे नाईक यांनी पराक्रम गाजवाला. अशी माहिती संजय केळकर यांनी उपस्थितांना दिली व ठाणे मुक्ती संग्रामाच्या आठवणींना उजाळा दिला.तर आमदार निरंजन डावखरे यांनी ठाणे मुक्ती दिनाच्या नागरिकांना शुभेच्छा दिल्या.
