मुंबई : अमरावती किंवा उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ आम्ही लढणारच आणि त्यासाठी आम्ही सह्यांची मोहीम राबवणार असून त्या सह्यांची निवेदन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना देणार आणि आपली ताकद दाखवणार असे जाहीर प्रतिपादन शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी दादर येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीमध्ये केले. ते पुढे म्हणाले विद्यमान खासदार नवनीत राणा यांची जात प्रमाणपत्र अगदी भोगत असून हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे यावर लवकरच जजमेंट येऊन त्यांना पुन्हा निवडणुकीला उभे राहता येणार नाही. अमरावती लोकसभा मतदारसंघांमध्ये केलेल्या सर्वेनुसार तेथील जनता नवनीत राणा यांचे ढोंग माजीला कंटाळली असून त्यांना पुन्हा खासदार करणार नाही तसेच त्यांचे हे ढोंग लवकरच बंद होईल. परंतु शिवसेना भाजप युतीने त्यांना पुन्हा एकदा संधी दिल्यामुळे अमरावती लोकसभा मतदारसंघातील जनतेमध्ये प्रचंड नाराज आहे. राणा यांचा प्रभावाकडून अमरावती लोकसभा मतदारसंघातील जनता त्यांचा सूड घेतल्याशिवाय राहणार नाही. उत्तर पश्चिम मतदारसंघांमध्ये आमची ताकद फार मोठ्या प्रमाणात असून आमच्या युनियनचे अनेक सभासद आणि कार्यकर्ते त्या ठिकाणी जोमाने कामाला लागले आहेत. तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही जागा आम्हाला सोडावी ती जागा आम्ही नक्कीच जिंकून दाखवू अशी माहिती त्यांनी या ठिकाणी दिली. या बैठकीमध्ये को-ऑपरेटिव बँक एम्प्लॉइज युनियनचे सुनिल साळवी, प्रमोद पारटे, जनार्दन मोरे असंख्य र्कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.