५६ वी राष्ट्रीय पुरुष-महिला अजिंक्यपद खो-खो स्पर्धा
दिल्ली : येथे सुरु असलेल्या 56 व्या पुरुष-महिला राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत महिला गटात तिसऱ्या सामन्यात महाराष्ट्राने इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस (आयटीबीपी) संघाचा पराभव करत वर्चस्व राखले.
हि स्पर्धा करमाळी सिंग क्रीडांगण, बसंत लेन, रेल्वे काॅलनी, पहारगंज येथे १ एप्रिलपर्यंत रंगणार आहे. सकाळच्या सत्रात रंगलेल्या अ गटातील महिला सामन्यात आयटीबीपी संघावर (54-10) एक डाव 44 गुणांनी एकतर्फी धुव्वा उडवत विजय मिळवला. महाराष्ट्रा कडून अश्विनी शिंदे (3.10 मि. संरक्षण व 2 गुण), प्रियांका इंगळे (3.50 मि. संरक्षण व 10 गुण), काजल भोर (2.50 मि. संरक्षण व 4 गुण), पूजा फरगडे (12 गुण ), अपेक्षा सुतार (२.४० मि. संरक्षण) यांनी चांगला खेळ केला. आयटीबीपी कडून पुनमने (१ मि. संरक्षण) चांगला खेळ केला.
महिला गटात महाराष्ट्राने उत्तर प्रदेशचा 26-14 असा एक डाव 12 गुणांनी पराभव केला. महाराष्ट्रा तर्फे काजल भोर (3.20 मि. संरक्षण व 4 गुण ), प्रियंका इंगळे (1.30, 2.10 मि. संरक्षण व 8 गुण ), सानिका चाफे 3.10 मि. संरक्षण ) यांनी चांगला खेळ करताना धमाकेदार विजय साजरा केला. तर उत्तर प्रदेश संघातर्फे खुशबू (1.10 मि. संरक्षण ), शिवानी (6 गुण ) यांनी चांगला खेळ केला. हे दोन्ही सामने जिंकून महाराष्ट्र संघ गटात अव्वल राहीला आहे.
पुरुष गटात महाराष्ट्राने तामिळनाडूचा 28-10 असा दहा गुणांनी पराभव केला. महाराष्ट्रा कडून प्रतीक वायकर (2.10 मि. संरक्षण ), अक्षय मासाळ (2 मि. संरक्षण ), लक्ष्मण गवस (नाबाद 1.30 मि. संरक्षण व 8 गुण ) यांनी उत्कृष्ट खेळ केला. तामिळनाडू कडून गिरी (1, 1 मि. संरक्षण व 4 गुण ), सुब्रमणी (4 गुण) यांनाच चांगला खेळ करता आला.
