Month: March 2024

जिल्हा परिषदेचे तालूकास्तरीय महाआरोग्य शिबिर संपन्न

ठाणे : जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत महाआरोग्य शिबिराचे आयोजित करणे या योजनेअंतर्गत तालूकास्तरीय आरोग्य शिबिराचे आयोजन प्राथमिक आरोग्य केंद्र शेंद्रूण, तालुका शहापूर येथे आयोजित करण्यात आले होते. या शिबिराकरिता जिल्हास्तरावरून अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भारत मासाळ तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भाग्यश्री सोनपिंपळे उपस्थित होते. ग्रामीण भागातील रुग्णांना आरोग्य विषय जागृकता निर्माण करण्यासाठी तालूकास्तरीय महाआरोग्य शिबिरात एकूण 762 लाभार्थ्यांनी लाभ दिला गेला. आरोग्य संबंधित माहिती, सेवा रुग्णांना देणे ही खरी गरज आहे अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे यांनी दिली. डॉ. अशोक नांदापूरकर उप संचालक मुंबई मंडळ ठाणे आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, गट विकास अधिकारी पंचायत समिती शहापूर, भास्कर रेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक आरोग्य केंद्र शेंद्रूण येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. रमेश राठोड आणि डॉ. अभिजीत वानखेडे आणि यांच्या सर्व कर्मचारी यांनी सदर शिबिरासाठी मोलाचे योगदान देत शिबिर यशस्वीरित्या संपन्न केले आहे. या शिबिरामध्ये एकूण 762 लाभार्थ्यांनी लाभ घेतला. त्यापैकी स्त्री रुग्ण 28, हृदयरोग 94, अस्थिरोग रुग्ण 27, दंतरोग 34, बालरोग रुग्ण 40, त्वचारोग 39, पोटाचे विकार 31, नाक कान घसा 50, रक्तदाब 200, मधुमेह 94, रक्त लघवी 25, ईसीजी 25, ब्रेस्ट कॅन्सर साठीची मॅमोग्राफी  30 लाभार्थ्यांची करण्यात आली व इतर 45 रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. सदर शिबिराकरिता हृदयरोग तज्ञ डॉ. रोहित बोबडे, न्यूरोलॉजिस्ट डॉ. डॉ दिलराज कडलस, बालरोग तज्ञ डॉ. श्याम राठोड,  स्त्रीरोग तज्ञ डॉ. अविनाश बढीये, , नेत्ररोग तज्ञ डॉ. देवयानी बढीये, त्वचारोग तज्ञ डॉ. प्रशांत जावळे, कान नाक घसा तज्ञ डॉ. वैभव किरपण, दंततज्ञ डॉ. वर्षा चव्हाण, अस्थिरोग तज्ञ डॉ. विशाल साळवे, वैद्यकीय अधिकारी डॉ. मानसी गायकवाड, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रूपाली रोडगे, नेत्रचिकित्सा अधिकारी विठ्ठल बडीये, जनरल फिजीशियन डॉ. हिरामण साबळे उपस्थित होते. यावेळी अधिकारी, तालुकास्तरीय समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सहाय्यक, सहाय्यीका, आरोग्य सेवक, सेविका, औषध निर्माण अधिकारी, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी उपस्थित होते.

भाजपच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे आता समोर येत आहेत – जितेंद्र आव्हाड

अनिल ठाणेकर ठाणे : जगाला पारदर्शी कारभाराचे बौद्धीक देणा-या भाजपच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे आता हळूहळू समोर येत आहेत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस, इंडिया आघाडीचे प्रवक्ते, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भाजपवर केला आहे. ‘इलेक्ट्रोल बॉन्ड’च्या माध्यमातून धनधांडग्यांच्या मानेवर सुरी ठेवल्यानंतर भाजपने सामान्य-गोरगरीब जनतेच्या नकळत त्यांच्या खात्यातून सरकारी योजनांसाठी पैसे वळते केल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे सरकारी बँक कर्मचा-यांना हाताशी घेऊन हा घोटाळा करण्यात आला आहे. लोकांची कोणतीही पूर्व परवानगी न घेता त्यांना सरकारी योजनांचा भाग केले गेले आणि लोकांच्याच टॅक्सचा पैसा वापरून भाजपची प्रतिमा उजळवण्यासाठी सरकारी जाहीरातींवर कोट्यवधी रूपये खर्च करण्यात आले, पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY) आणि पंतप्रधान सुरक्षा विमा योजना (PMSBY) अंतर्गत एप्रिल २०२३ पर्यंत अनुक्रमे १६.२३ कोटी आणि ३४.१८ कोटी नागरिकांनी याचा लाभ घेतल्याची आकडेवारी सांगितली जात असली तरी यातील बहुतांश लोकांच्या नकळत त्यांच्या खात्यातून योजनांसाठी पैस काढले गेले आहेत. लोकांच्या खात्यातून सरकारी योजनांकडे हे पैसे वळते करण्याचे आदेश वरून देण्यात आले असल्याची कबुली स्टेट बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, युको बँक, बँक ऑफ बडोदा आणि पंजाब नॅशनल बँकांच्या कर्मचा-यांनी दिली आहे. ‘Article 14’ या पोर्टलच्या @HemantGairola25 यांनी लिहिलेल्या रिपोर्टमध्ये, कशाप्रकारे खुलेआमपणे लोकांच्या बँक खात्यांवर डल्ला मारण्यात आला याची इत्यंभूत माहिती आकडेवारी सहित देण्यात आली आहे. article-14.com/post/banks-wan...मुख्य धारेतील मीडियाच्या रडारवरून भाजप विरोधी बातम्या केव्हाच गायब झाल्या आहेत. पण भाजपवाले आणि गोदी मीडियावाले एक गोष्ट विसरतात ‘सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं, असे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटर वर ट्विट करताना म्हटले आहे.

अश्विन शेळकेचा अष्टपैलू खेळ

४८वी ठाणेवैभव आंतरकार्यालयीन वासंतिक क्रिकेट स्पर्धा ठाणे : अश्विन शेळकेचा अष्टपैलू खळे आणि त्याला तेवढीच तोलामोलाची साथ देणाऱ्या  अरमान पठाणच्या मोलाच्या योगदानामुळे युनायटेड पटनी इंडस्ट्रीज संघाने बिनेट कम्युनिकेशन संघाचा चार विकेट्सनी पराभव करत ४८ व्या ठाणेवैभव आंतरकार्यालयीन वासंतिक क्रिकेट स्पर्धेतील की गटाच्या अंतिम फेरीत स्थान मिळवले. बिनेट कम्युनिकेशन संघाने दिलेले १७५ धावांचे आव्हान युनायटेड पटनी इंडस्ट्रीज संघाने ३५ षटकात १७७ धावा करत विजय निश्चित केला. युनायटेड पटनी इंडस्ट्रीज संघाने टॉस जिकंत प्रथम क्षेत्ररक्षण स्विकारले. भूषण शिंदेने आक्रमक फलंदाजी करत ४३ धावांसह बिनेट कम्युनिकेशन संघाच्या धावसंख्येला आकार दिला. दीपक भोगलेने ३१, सिद्धार्थ घुलेने २५ आणि सागर मुळयेने २४ धावा बनवत संघाच्या धावसंख्येत योगदान दिले. अश्विन शेळके आणि पार्थ चंदनने प्रत्येकी तीन गडी बाद केले. अरमान पठाण आणि ओमर पटनीने प्रत्येकी दोन फलंदाज बाद केले. गोलंदाजीप्रमाणे फलंदाजीतही छाप पाडताना अश्विनने २५ चेंडूत नाबाद ४७ धावांची खेळी करत युनायटेड पटनी इंडस्ट्रीज संघाला विजयाचा दरवाजा उघडून दिला. अर्धशतकापासून वंचीत राहिलेल्या अश्विनने आपल्या खेळीत दोन चौकार आणि चार षटकार ठोकले. अरमान पठाणने ३२ धावा केल्या. सिद्धार्थ घुलेने दोन गडी बाद केले. तर सिद्धार्थ नरसिम्हा, प्रथमेश बेलछेडा आणि दिपक भोगलेने  प्रत्येकी एक विकेट मिळवली. संक्षिप्त धावफलक : बिनेट कम्युनिकेशन : ३४ षटकात सर्वबाद १७५ ( भूषण शिंदे ४३, दिपक भोगले ३१, सिद्धार्थ घुले २५, सागर मुळये २४, अश्विन शेळके ७-३१-३, पार्थ चंदन ७-४२-३, अरमान पठाण ७-२४-२, ओमर पटनी ६-२७-२) पराभूत विरुद्ध  युनायटेड पटनी इंडस्ट्रीज : ३३.४ षटकात ६ बाद १७७ ( अश्विन शेळके नाबाद ४७ , अरमान पठाण ३२, सिद्धार्थ घुले ७-१-३०-२, सिद्धार्थ नरसिम्हा २.४- २४-१, प्रथमेश बेलछेडा ७-३०-१, दिपक भोगले ७-३२-१).

शिमगाच, पण नव्या काळातला

खास बात डॉ. चंद्रशेखर टिळक पूर्वी शिमग्याच्या सणाला मनातील सगळा राग बाहेर काढला जायचा. होळी पेटल्यानंतर जोराने बोंब ठोकत एकमेकांना अर्वाच्च भाषेत लाखोली वाहिली जायची. एक प्रकारे तेव्हाच्या समाजव्यवस्थेने माणसांच्या…

मिरचीचा तिखटपणा झाला कमी

लाल मिरची उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. प्रचंड आवक झाल्याने मिरचीच्या दरात प्रति क्विंटल १५ हजार रुपयांनी घट झाली आहे. मिरचीच्या दरात घट झाल्यामुळे शेतकरी आक्रमक झाले. त्यावरून राजकारणही तापले…

आपण सर्व माणूस होवूयात…!

विशेष मनोज शिवाजी सानप शहरातील एका चर्चित दुकानात लस्सी ची ऑर्डर देऊन आम्ही सर्व मित्र-मंडळी आरामात बसून एक दुसऱ्याची चेष्टा मस्करी करीत होतो‌. तेवढ्यात ७० – ७५च्या वयाची म्हातारी स्त्री…

दिल्लीचे दारु कांड !

दिल्ली राज्य सरकारचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा सध्याचा निवास आहे तिहार जेल. खरेतर त्यांनी दिल्ली सरकारच्या मुख्यमंत्र्यांसाठी अत्यंत आलीशान असे निवासस्थान तयार करून घेतले . पण तिथे गेल्यापासूनच त्यांच्या मागे…

मुख्यमंत्री शिंदेनी लुटला नातवासोबत धुळवडीचा आनंद

ठाणे: होळी धुळवडीनिमित्त मित्र आणि शत्रूही गळाभेट घेतात. त्यामुळे राजकारण विरहित होळी साजरी करू या. असा सल्ला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी होळी सणानिमित्त ठाण्यातील टेंभी नाका येथे आयोजित…

उद्धव ठाकरेंकडून आज उमेदवारांची घोषणा

मुंबई : महाविकास आघाडीचे जागा वाटप आता अंतिम टप्प्यात असून ज्या जागांवर एकमत झाल्या आहेत त्या शिवसेना उध्दव ठाकरे गटांच्या जागांची घोषणा आज उद्धव ठाकरे करणार आहेत. तशी माहिती उद्धव…