पुतीन बनणार आणखी शक्तिशाली
रशियामध्ये नुकतीच निवडणूक झाली आणि या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे रशियाचे राष्ट्राध्यक्ष वालदिमिर पुतीन हे ८८ टक्के मते मिळवून सलग पाचव्यांदा विजयी झाले. २००० साली वालदिमिर पुतीन हे जेंव्हा पहिल्यांदा राष्ट्राध्यक्ष बनले…
रशियामध्ये नुकतीच निवडणूक झाली आणि या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे रशियाचे राष्ट्राध्यक्ष वालदिमिर पुतीन हे ८८ टक्के मते मिळवून सलग पाचव्यांदा विजयी झाले. २००० साली वालदिमिर पुतीन हे जेंव्हा पहिल्यांदा राष्ट्राध्यक्ष बनले…
लांबच्या प्रवासात प्रवासी नेहमी जेवणाची ऑर्डर देतात; पण आता ट्रेनमधील स्वयंपाकाचा संपूर्ण नियमच बदलणार आहे. जून महिन्यापासून भारतीय रेल्वेच्या पँट्री कारमध्ये प्रवाशांसाठी जेवण तयार केले जाणार नाही. पँट्रीचा वापर गरज…
अन्यथा या निवडणुक सर्वेक्षणांवर कोणाचाच विश्वास राहणार नाही… लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज भरणे सुरू झाले आहे. पहिल्या टप्प्यातील मतदारसंघात तर अर्ज भरण्याची तारीखही संपली आहे. असे असले तरी राज्यात सध्या दोन…
परामर्ष हेमंत देसाई युरोपियन फ्री ट्रेड असोसिएशन भारतात १०० अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार आहे. या करारामुळे भारतातील आयटी सेवांची निर्यात वाढून कुशल मनुष्यबळाला परदेशात अधिक संधी प्राप्त होईल. येत्या सहा…
५६ वी राष्ट्रीय पुरुष-महिला अजिंक्यपद खो-खो स्पर्धा मुंबई : भारतीय खो-खो महासंघाच्या वतीने दिल्ली येथे होणाऱ्या ५६ व्या पुरुष-महिला राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेचा थरारा गुरूवारपासून सुरू झाला आहे. महाराष्ट्राचे दोन्ही संघ अव्वल कामगिरी करण्यासाठी सज्ज झाले आहेत. हि स्पर्धा करमाळी सिंग क्रीडांगण, बसंत लेन, रेल्वे कॉलनी, पहारगंज येथे १ एप्रिलपर्यंत रंगणार आहे. महाराष्ट्राच्या महिला संघाने आसामचा एक डाव २६ गुणांनी (३६-१०) धुवा उडवत विजयी सलामी दिली. महाराष्ट्राकडून अश्विनी शिंदे (३.२० मि. संरक्षण व ८ गुण), अपेक्षा सुतार (२.५० मि. संरक्षण व २ गुण), रेश्मा राठोड (२.४० मि. संरक्षण व ४ गुण), संपदा मोरे (नाबाद २ मि. संरक्षण व ४ गुण) यांनी चांगला खेळ केला. आसामकडून प्रिया (१.४०, १.२० मि. संरक्षण), निहारिका (२ गुण) यांनी चांगला खेळ केला. मात्र महाराष्ट्राच्या आक्रमक खेळापूढे आसामचा संघ टिकाव धरू शकला नाही. दरम्यान, पुरूष गटात त्रिपूरा संघ उपस्थित नसल्यामुळे महाराष्ट्र संघाला पुढे चाल देण्यात आली आहे. या स्पर्धेची गटवारी पुढील प्रमाणे पुरूष अ गट: रेल्वे, पाॅडेचेरी, पंजाब, इंडो-तिबेटीअन बाॅर्डर पोलीस, एसएसबी. ब गट: महाराष्ट्रासह तामिळनाडू, त्रिपूरा, मणिपूर, आसाम. क गट: कोल्हापूर, दिल्ली, हरयाणा, दादरा-नगर हवेली, सिक्कीम. ड गट: कर्नाटक, मध्यभारत, झारखंड, उत्तराखंड, महा पोलीस. इ गट: ओडीसा, विदर्भ, हिमाचलप्रदेश, लडाख. फ गट: आंध्रप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, जम्मु-काश्मिर. ग गट: वेस्टबंगाल, गुजरात, उत्तरप्रदेश, बिहार. ह गट: केरळ, तेलंगणा, गोवा, चंदिगड यांचा समावेश आहे. महिलांमध्ये अ गट: महाराष्ट्र, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, इंडो-तिबेटीअन बाॅर्डर पोलीस आणि आसाम यांचा समावेश आहे. ब गट : एअरपोर्ट, राजस्थान, तेलंगणा, एसएसबी, सिक्कीम. क गट: दिल्ली, आंध्रप्रदेश, झारखंड, दादरा-नगर हवेली, त्रिपूरा. ड गट: ओडिसा, पंजाब, पाँडेचेरी, जम्मू-काश्मिर, महा पोलीस. इ गट: गुजरात, तामिळनाडू, मध्यप्रदेश, गोवा, लडाख. फ गट: केरळ, विदर्भ, हिमाचल प्रदेश, मणिपूर. ग गट: कर्नाटक, कोल्हापूर, उत्तराखंड, बिहार. ह गट: हरयाणा, वेस्टबंगाल, छत्तीसगड, चंदिगड. आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय अनूभवी खेळाडूंचा भरणा असलेल्या महाराष्ट्रचे दोन्ही संघ अव्वल कामगिरीसाठी सज्ज आहेत, असा विश्वास भारतीय महासंघाचे सहसचिव डॉ. चंद्रजीत जाधव, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सरचिटणीस अॅड. गोविंद शर्मा यांनी व्यक्त केला आहे.
मुंबई : ४६ वी सब ज्युनिअर राष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धा २८ ते ३१ मार्च २०२४ दरम्यान जीवन दीप शिक्षण संस्था, वाराणसी, उत्तर प्रदेश येथे संपन्न होत आहे. या स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे १५ खेळाडू आणि २ व्यवस्थापक असा एकंदर १७ जणांचा चमू वाराणसी येथे रवाना झाला असून संघातील खेळाडूंना महाराष्ट्र कॅरम असोसिएशनतर्फे वातानुकूलित रेल्वे प्रवास व्यवस्था, २ सेट गणवेश व प्रत्येकी रुपये १,०००/= प्रवास भत्ता अशी सुविधा देण्यात आली आहे. महाराष्ट्राचा संघ पुढीलप्रमाणे १४ वर्षा खालील ( सब ज्युनिअर गट ) मुले : आयुष गरुड, रुद्र गवारे, वेदांत राणे, द्रोण हजारे, ध्रुव भालेराव, प्रसाद माने १२ वर्षां खालील ( कॅडेट गट ) मुले : नील म्हात्रे, अनंत जैन ( नंदू सोनावणे, संघ व्यवस्थापक ) १४ वर्षा खालील ( सब जुनिअर गट ) मुली : तनया पाटील, स्वरा मोहिरे, पूर्वा केतकर, स्वरा कदम, जिशा आसलडेकर १२ वर्षा खालील ( कॅडेट गट ) मुली : दुर्गेश्वरी धोंगडे, निधी सप्रे ( माधवी आसलडेकर, संघ व्यवस्थापक ) अरुण केदार मानद सचिव महाराष्ट्र कॅरम असोसिएशन
माथेरान : माथेरान मधील मुख्य रस्स्यावर लावण्यात आलेले क्ले पेव्हर ब्लॉक निकृष्ट दर्जाचे असल्याने जागोजागी खड्डे पडले आहेत त्यामुळे किरकोळ अपघात घडत असतात याकामी रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी यासाठी सामाजिक कार्यकर्ते राकेश कोकळे यांनी नगरपरिषदेच्या कार्यालयात प्रशासक राहुल इंगळे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. एमएमआरडीए च्या माध्यमातून जवळपास चाळीस कोटी रुपये खर्च करून दस्तुरी पासून माथेरान गावांपर्यंत पर्यावरण पूरक क्ले पेव्हर ब्लॉकचे रस्ते बनविण्यात आले होते परंतु अत्यंत घाईगडबडीत ही कामे उरकण्यात आली होती. आणलेले ब्लॉक हे उत्तम दर्जाचे आहेत किंवा नाही याची शहानिशा न करता कामे पूर्ण करण्यात आली. त्यामुळे बहुतेक ठिकाणी कच्चे ब्लॉक होते ते झिजून गेल्याने जागोजागी खड्डे पडले आहेत. यातून मार्ग काढताना पादचाऱ्यांना तसेच पर्यटक, हातरीक्षा, घोडेवाल्याना खूपच त्रासदायक ठरत असून या खड्ड्यात पडून अनेकजण जखमी झाले आहेत. पुढील दोन महिने सुट्टयांचा हंगाम येत असून खड्डेमय रस्त्यामुळे पर्यटनावर विपरीत परिणाम होऊ नये यासाठी लवकरच ही कामे पूर्ण करून घ्यावीत असे राकेश कोकळे यांनी निवेदनात म्हटले आहे. यावर लवकरच ठोस उपाययोजना करण्यात येईल असे उत्तम प्रशासक तथा कार्यक्षम मुख्याधिकारी राहुल इंगळे यांनी सांगितले.
ज्ञानेश्वर पाटील यांना मिळालेली रयत शिक्षण संस्थेचे कुबेर ही उपमा कौतुकास्पद राज भंडारी पनवेल : रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि. बा. पाटील ज्युनियर कॉलेज या विद्यालयात वरिष्ठ लेखनिक असलेले ज्ञानेश्वर पाटील यांचा सेवापुर्ती सत्कार समारंभ दि. २७ मार्च रोजी जासई येथे संपन्न झाला. रयत शिक्षण संस्थेच्या जासई विद्यालयात त्यांना विद्यालयाच्यावतीने सर्व सेवकांकडून सपत्नीक सन्मान करण्यात आला. सायंकाळी त्यांच्या कुटुंबीय, आप्तेष्ट व मित्र मंडळींकडून घरगुती सोहळ्याचे नियोजन करण्यात आले होते. सदर सोहळ्याला ज्येष्ठ शिक्षक नेते दा.चां.कडू गुरुजी सोहळ्याचे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. पंचक्रोशीतील अनेक मान्यवरांनी याठिकाणी उपस्थित राहून ज्ञानेश्वर पाटील यांचे अभिनंदन करून पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. या सोहळ्याची सुरुवात ज्ञानेश्वर पाटील यांच्या सेवापूर्तीतील ३६ वर्षे त्यांच्या संघर्षाची कहाणी उपस्थितांसमोर कथित करण्यात आली. शिक्षक नेते दा.चां.कडू यांनी ज्ञानेश्वर पाटील यांची सेवाभावी वृत्ती, प्रामाणिकपणा आदी बाबी निदर्शनास आणताना नात्यापेक्षा आपल्या बरोबर त्यांनी जपलेले स्नेहसंबंध हे रक्ताच्या नात्यापेक्षा निश्चितच श्रेष्ठ असल्याचे गौरवोद्गार काढले. सत्काराला उत्तर देताना ज्ञानेश्वर पाटील व त्यांच्या सौभाग्यवती भावूक झाले होते. आपल्या छोटेखानी भाषणात त्यांनी आपल्या प्रामाणिक सेवेच्या घडामोडी कथन केला. यावेळी दा.चां.कडू गुरुजी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना ज्ञानेश्वर पाटील यांच्या सेवेतील अनेक ठिकाणांच्या शैक्षणिक सेवांना उजाळा दिला. ज्ञानेश्वर पाटील यांच्याबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की, ज्ञानेश्वर पाटील यांच्या आजोबांनी रयत शिक्षण संस्थेला जासई शाळेसाठी एक एकर जागा बक्षीस रूपाने दिली होती. ज्ञानेश्वर पाटील हे बीएससी झाल्यानंतर रयत शिक्षण संस्थेने एक एकर जागेची जाणीव ठेवत ज्ञानेश्वर पाटील यांच्या शिक्षणाची दखल घेवून त्यांना आपल्या शिक्षण संस्थेत रुजू करून घेतले. सुरुवातीपासूनच अतिशय हुशार आणि प्रामाणिक असलेले ज्ञानेश्वर पाटील यांना संस्थेने सहाय्यक लेखनिक पदाची जबाबदारी सोपविली. सुरुवातीला उरण तालुक्यातील गव्हाण येथील शाळेत सेवा दिल्यानंतर त्यांची पोलादपूर तालुक्यातील तुर्भे आणि नंतर पैठण याठिकाणी बदली झाली. त्यानंतर महाड तालुक्यातील विन्हेरे येथे देखील त्यांनी सेवा केली. नंतर मात्र संस्थेने त्यांना त्यांच्या घराजवळ पनवेल तालुक्यातील रिटघर नंतर दापोली – पारगाव येथे बदली केली. रयत शिक्षण संस्थेतील त्यांच्या प्रामाणिक कामाची पोहोच म्हणून एक अनोखी भेट रयत शिक्षण संस्थेच्यावतीने त्यांना देण्यात आली. आजोबांनी बक्षिसी रूपाने दिलेल्या एक एकर जागेत वसलेल्या शाळेतच त्यांची बदली ही त्यांच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. या सर्वच शाळेतील त्यांच्या कामावर रयत शिक्षण संस्थेचे वरिष्ठ नेहमीच खुश राहत. कारणही तसेच होते, या सर्व प्रवासादरम्यान ते मुख्य लेखनिक या पदावर काम करीत असताना शाळेच्या व्यवहारात कोणताही अपहार ना त्यांनी केला ना त्यांच्यामार्फत कोणाला करू दिला. त्यामुळे रयत शिक्षण संस्थेचे ते कुबेर म्हणून त्यांना शाळेत संबोधले जावू लागले. कुबेर ही उपमा ज्ञानेश्वर पाटील यांना मिळणे ही बाब मुळात कौतुकास्पद असल्याचे दा.चां.कडू गुरुजींनी यावेळी सांगितले. दा.चां.कडू गुरुजींनी यावेळी सांगितले की, मला सेवानिवृत्त होऊन २७ वर्षे झाली. मी आजही निरोगी आहे. सध्या माझे वय ८७ वर्षांचे आहे. आपण दररोज घरातील किरकोळ कामे स्वतः करीत असतो. ज्ञानेश्वर पाटील यांनीही घरातील परिसरातील छोटीमोठी कामे करून आपले शरीर सुदृढ ठेवावे. त्यांच्या अर्धांगिनी वनिता पाटील, बँकेत असिस्टंट मॅनेजर असलेले त्यांचे चिरंजीव आदित्य पाटील, स्नुषा अवंतिका आणि धा.चिरंजीव केतन पाटील यांची भरभक्कम साथ असल्यामुळे ज्ञानेश्वर पाटील यांचे उर्वरित आयुष्यही आनंदात जाईल, असा विश्वास कडू यांनी व्यक्त केला.
तुकाराम बीजनिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पनवेल तालुक्यातील कोपर येथील मंदिरात जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे मनोभावे दर्शन घेतले. या यावेळी ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, कामगार नेते महेंद्र घरत, माजी उपसरपंच विजय घरत, अनंता ठाकूर, सुधीर ठाकूर, जयवंत देशमुख, किशोर पाटील, साईचरण म्हात्रे, यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.