रमेश औताडे
मुंबई :राज कुमार प्रॉडक्शन्स सध्या आपला आगामी बहुप्रतिक्षित चित्रपट ‘अमीना’ मुळे चर्चेत आहेत. चाहते चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत असून काही दिवसांपूर्वी निर्मात्यांनी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज केला होता जो पाहण्यासाठी चाहते उत्सुक होते. आता अखेर निर्मात्यांनी चित्रपटाच्या रिलीजची अधिकृत तारीख जाहीर केली आहे.
ईदच्या मुहूर्तावर हा चित्रपट चित्रपटगृहात दाखल होण्यासाठी सज्ज झाला आहे. आजच्या महिलांसाठी धडा असलेल्या या चित्रपटात अभिनेत्री रेखा राणा यांनी महत्त्वाची भूमिका साकारली आहे. राज कुमार प्रॉडक्शनने मुंबई प्रेस क्लब येथे माध्यमांशी संवाद साधत अमिना चित्रपटाबाबत माहिती दिली.
चित्रपटाचे नवीन पोस्टर मीडिया अकाउंटवर रिलीज झाले आहे. ज्यामध्ये ती हॉलिवूड अभिनेत्रीच्या स्टाईलमध्ये दिसत आहे. पोस्टरसोबतच राज कुमार प्रोडक्शनने चित्रपटाची रिलीज डेटही जाहीर केली आहे.
१२ एप्रिल रोजी ईदच्या मुहूर्तावर थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. ईदच्या निमित्ताने या, आनंदी रहा आणि १२ एप्रिल रोजी चित्रपटगृहांमध्ये आमच्यासोबत सेलिब्रेट करा. चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित कथेची झलक पाहायला मिळणार असून हा चित्रपट अमीनाच्या जीवनचरित्रातील सत्य घटनेवर आधारित आहे.