माथेरान : माथेरान मध्ये ई-रिक्षा सुरू झाल्यानंतर दळणवळणाचे एक नवीन पर्व सुरू होणार आहे या ई रिक्षांमुळे हात रिक्षा या कालबाह्य होणार असून हात रिक्षा ओडणाऱ्यांना एक सन्मानजनक व्यवसाय मिळणार आहे परंतु हात रिक्षा या फक्त माथेरानमध्ये सुरू आहे जे येथील पर्यटकांना एक वेगळे आकर्षण वाटत असते त्या सुखास पर्यटक मुकणार आहेत व ई रिक्षांमुळे पर्यटक वाढणार का हा मोठा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे.
माथेरान मध्ये हातरिक्षा व घोडे हे वाहतुकीचे मुख्य पर्याय माथेरान मध्ये उपस्थित आहेत ज्यावर येथील स्थानिकांचे अर्थचक्र चालते माथेरान मधील सर्वात मोठा व्यवसाय घोडे व्यवसाय म्हटले तर वावगे ठरणार नाही 460 घोडे येथे पर्यटकांच्या दिमतीस आहेत व जवळ जवळ 300 कुटुंबे हा व्यवसाय करीत आहे रिक्षांमुळे यांच्या व्यवसायावरती तर गदा येणार नाही ना अशी भीती नेहमीच घोडे व्यावसायिकांना वाटत असते अनेक पर्यटक येथे फक्त घोडेस्वारीसाठी येत असतात ई-रिक्षांमुळे त्यांच्या संख्येत घट तर होणार नाही ना अशी शंका येथील घोडेव्यवसायिक नेहमीच बोलून दाखवत असतात तर रिक्षांसाठी बनविण्यात येणाऱ्या क्ले पेव्हर ब्लॉक ला घोडे व्यवसायिकांचा विरोध आहे.
माथेरान मधले 94 हात रिक्षा परवाने वितरित केले गेले आहे परंतु प्रत्यक्षात मात्र किती रिक्षा रस्त्यावर चालतात हा संशोधनाचा विषय आहे सध्या माथेरान मध्ये हात रिक्षा चालवण्याकरता खानदेशातील मजूर आलेले आहेत व तेच हा व्यवसाय करीत आहे व माथेरान मधील काही जुने ठराविक हात रिक्षा चालक या व्यवसायात अजूनही टिकून आहेत ज्यांना खरोखर ई रिक्षाची गरज आहे परंतु काही रिक्षा चालकांनी आपल्या रिक्षा ह्या खानदेशी मजुरांना भाडेतत्त्वावर चालवण्याकरता दिलेल्या आहेत व ई रिक्षा सुरू झाल्यानंतर या रिक्षांचे भाव गगनाला भिडले असून पंधरा हजार रुपये मध्ये विकली जाणारी रिक्षा आता सात ते आठ लाखांमध्ये विकली जात आहे याचाच अर्थ पर्यटन बरोबर आहे स्वतःचा विकास या हातरिक्षा चालकांचा होणार आहे परंतु ई रिक्षामुळे पर्यटन क्रांती होणार का हा मोठा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे. सध्या 35 रुपये इतक्या माफक दरामध्ये चालणारी ही रिक्षा प्रायोगिक तत्त्वावर सुरू आहे परंतु कायमस्वरूपी सुरू झाल्यानंतर त्यामध्ये बदल होणार का व आता माफक दरात असलेली सेवा अविरत सुरू राहिली तरच त्याचा फायदा येथील पर्यटन वाढीस होणार आहे नाहीतर ज्याप्रमाणे घोड्यांचे भाव दस्तुरी येथून माथेरान साठी आकारले जातात तसे रिक्षाचे होऊ नये याची खबरदारी आतापासूनच रिक्षा चालकांना घ्यायला हवी तरच त्याचा फायदा येथील पर्यटन वाढीस होणार आहे.असेही बोलले जात आहे.