संघटना संयुक्त कृती समितीच्या परिषदेत एकमुखी ठराव!

मुंबई : येत्या लोकसभा निवडणुकीत कामगार, किसान,जनता विरोधी नरेंद्र मोदी सरकारचा पराभव करा,असा एकमुखी ठराव, सर्व कामगार संघटना एकत्र आलेल्या, कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीच्या राज्यस्तरीय राजकीय संमेलनात सम्मत करण्यात आला.

 राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या,परेल येथील महात्मा गांधी सभागृहात शनिवारी कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीचे‌ राज्य स्तरीय राजकीय सम्मेलन पार पडले.त्या संमेलनात उपस्थित कामगार प्रतिनिधींनी हात उंचावून या ठरावाला पाठिंबा दिला.इंटक,आयटक, एसएमएस,सिटू,एआयसीसीटीयू,बीकेएस एम,राज्य सरकारी कर्मचारी संघटना महासंघ, शिक्षक संघटना,बॅंक आणि विमा संघटना महासंघ, श्रमिक एकता मंच आणि तळागाळातील कामगारांचे‌ नेतृत्व करणाऱ्या संघटना या राज्यस्तरीय राजकीय संमेलनात सहभागी झाल्या होत्या.व्यासपीठावर कॉ. विवेक मोंटेरो, कॉ. मिलिंद रानडे, कॉ. उदय भट, गोविंदराव मोहिते,डॉ.कैलास कदम ,डॉ. डी. एल. कराड, कॉ. उदय चौधरी,  निवृत्ती धुमाळ आदी कामगार नेते उपस्थित होते.

राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष आणि भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस आमदार सचिनभाऊ अहिर यांनी संमेलनाला शुभेच्छा दिल्या आहेत. ठरावात पुढे म्हटले आहे,सध्या सत्तेवर असणारे केंद्र व राज्य सरकार हे सातत्याने कामगारांवर अन्याय करीत असून मालक व भांडवलदारा चे हित जोपासत आहे.भांडवलदारांच्या दबावापोटी कामगार संघटनां नी १३० वर्षांपासून लढून मिळवीलेले ४४ कामगार कायदे रद्द करून, त्या जागी चार श्रम संहिता आणल्या आहेत.

हे सरकार परत सत्तेवर आल्यास या देशातील कामगार चळवळ संपुष्टात येऊन कामगारांना वेठबिगारीचे जीवन वाट्याला येणार! अशी ठरावात काळजी व्यक्त करण्यात आली आहे.

कृती समितीचे प्रमुख सिटुचे डॉ.डि. एन.कराड ठरावावर म्हणा ले,आपल्या सर्व संघटनांचे सदस्य राज्यात सुमारे ३५ लाख असून, त्याचे कुटुंबीय मिळून कोटी-सव्वा कोटीचे मताधिक्य मोठाच या निवडणुकीत चांगलाच प्रभाव पाडू शकतो.कामगार विरोधी मोदी सरकारला सत्तेवरुन खाली खेचू शकेल, असेही कराड आपल्या भाषणात म्हणाले.महाराष्ट्र इंटकचे अध्यक्ष कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना म्हणाले,येणारा एक मे कामगार दिन मोदी सरकार विरोधी कामगार निषेधदिन पाळतील! सरचिटणीस गोविंदराव मोहिते ठरावाला पाठिंबा देतांना म्हणाले,अंगणवाडी,आशा कामगार पासून  गिरणी कामगारां पर्यंत कामगार वर्गाला नामोहरम करणा-या मोदी सरकारला सत्तेवरून खाली खेचण्याची हीच खरी वेळ आहे.

या प्रसंगी भारतीय कामगार सेनेचे संतोष चाळके,एनटीआयचे मिलिंद रानडे, कॉ.उदय भट,कॉ. विवेक मोंटेरो, कॉ.उदय चौधरी, निवृत्ती धुमाळ आदींनी आपल्या भाषणात मोदीं सरकारचा खरपूस समाचार घेताना, महाराष्ट्रात मोदी सरकारला  महाविकास आघाडीच खरा पर्याय ठरू शकेल, असा इंटकने विश्वास व्यक्त केला आहे. बजरंग चव्हाण, दादासाहेब डोगरे आदींनी ठरावाला पाठिंबा कामगार विरोधी धोरणांचा निषेध केला.

०००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *