मुंबई : नर्मदा परिक्रमा ही देवस्थान तीर्थक्षेत्र पेक्षाही श्रेष्ठ आहे. अनमोल अशी नर्मदा परिक्रमा जीवनात एकदा नाही तर पुन्हा पुन्हा करावी असे आवाहन ‘रामकृष्ण विनामूल्य वाचनालयाच्या ग्रंथपाल व साहित्य संपादिका,तसेच अखिल सक्षम महिला मंच समुपदेशक नंदिनी मनोहर सोनवणे यांनी केले. जीवनातील अनमोल नर्मदा प्रदक्षिणा
इगतपुरी तालुक्यातील पिंप्री सदोबा गावातील श्री व सौ.नंदिनी मनोहर सोनवणे यांनी स्व: वाहनाने 16 दिवसांची नर्मदा परिक्रमा केली. त्या निमित्ताने बोलताना त्यांनी परिक्रमाविषयी आपले काही अनुभव सांगितले. ९ जानेवारी रोजी नर्मदा परिक्रमाला आरंभ केला. प्रथम ओंकारेश्वर दक्षिण तटावर संकल्प पूर्ती करून रेवा संगम ते अमरकंटक हा दक्षिण तटाचा प्रवास पूर्ण झाला. उत्तर तटाचा प्रवास अमरकंट ते ओंकारेश्वर हा प्रवास पूर्ण झाला. हे संपूर्ण अंतर ४२०० किलोमीटर प्रवास आहे. दक्षिण तटावरील प्रवास करताना जागोजागी अन्नकुठाची व्यवस्था व ऋषीमुनी व सेवाभावी का या परिक्रमावासहित भेटत होत्या. परिक्रमा करताना दुसरे सहचारी क्रमा करणारे चांदवड देवीच्या येथे राहणारे सौ मंदा अशोक महाले यांची योगायोगाने भेट झाली. हा योगायोग परतीच्या प्रवासात चांदवड देवीचे दर्शन घेतले. मार्कंड ऋषी यांनी प्रथम नर्मदा परिक्रमा केल्याचे शास्त्र पुराण सांगते. परिक्रमा करताना मार्कंड ऋषींच्या आश्रमात गेलं असता गुरु मिळाल्याचा आनंद झाला. 22 जानेवारीला रोजी आयोध्या मध्ये राम लल्ला यांच्या स्थापनेचा दिवस व त्याच दिवशी आम्ही अमरकंटक पोहोचलो. अमरकंटक मध्ये नर्मदा मातेचे उगम स्थान आहे. राम लल्लनच्या स्थापने च्या रथयात्रेत कलश घेऊन त्या रथयात्रेत सामील झाले. धारवड असं क्षेत्र आहे की महा नर्मदेच्या पात्रातून स्वयंभू बाणलिंग मिळतात. आम्हाला असंख्य लहान ते महान शिवलिंग बघण्यास मिळाले. नंदिनी सोनवणे बोलताना म्हणाल्या की, प्रत्येक जळी स्थळी काष्टी पाषाणी शिव मंदिर व त्यातील स्वयंभू साक्षात्कार मिळत गेला हा महिमा शिवकृपेचा रूपाने साकारत गेला. प्रत्येक क्षणी नर्मदा तीरावरून जात असताना जशी महा नर्मदा हातात वीणा घेऊन झंकारित केल्याचा आवाज येत होता 16 दिवसांत मा नर्मदा स्तोत्र आरती व हर हर नर्मदे घोष अजूनही मनात कोरले गेले आहे हर हर नर्मदे.. नंदिनीताई यांनी आपले काही काही अनुभव आम्हास सांगितले. ओंकारेश्वर मध्ये प्रथम गजानन महाराजांच्या आश्रम मुक्काम व तोच परतीच्या प्रवासामध्ये मुक्काम तेथेच घडला.