एमसीए प्रेसिडेंट कप ए डिव्हिजन स्पर्धा
मुंबई : एमसीए प्रेसिडेंट कप ए डिव्हिजन स्पर्धेत नानावटी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलने मुंबई पोर्ट ट्रस्ट स्पोर्ट्स क्लबवर 2 धावांनी विजय मिळविला. मुंबई पोर्ट ट्रस्ट स्पोर्ट्स क्लब अ ने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. त्यानंतर प्रथम फलंदाजी करताना नानावटी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संघाने 20 षटकांत 120 धावा केल्या. मुंबई पोर्ट ट्रस्ट स्पोर्ट्स क्लबकडून दशरथ चव्हाणने 13 धावांत निम्मा संघ गारद करताना छाप पाडली.
मात्र, प्रतिस्पर्धी संघाला कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा मुंबई पोर्ट ट्रस्ट स्पोर्ट्स क्लबचा आनंद अल्पकाळ ठरला. गोलंदाजीला अनुकूल पीचवर नानावटी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या देवेंद्रनाथ परिदा आणि ऍशले डी.सूझाने प्रत्येकी 3 विकेट घेत प्रतिस्पर्धी संघाला 20 षटकांत 9 बाद 118 धावामध्ये रोखले. दिवसातील दुसऱ्या सामन्यात मफतलाल क्रिकेट क्लबने सीजीएसटी आणि सीई मुंबई झोनचा २७ धावांनी पराभव केला.
संक्षिप्त धावफलक : नानावटी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल – 20 षटकांत सर्वबाद 120(साई चव्हाण 31, तुषार सिंग 22; दशरथ चव्हाण 5/13) वि. मुंबई पोर्ट ट्रस्ट स्पोर्ट्स क्लब – 20 षटकांत 9 बाद 118 (श्रीराज घरत 29; देवेंद्रनाथ परिडा 3/18, ऍशले डी. ‘सूझा 3/24). निकाल: नानावटी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल दोन धावांनी विजयी
मफतलाल क्रिकेट क्लब -20 षटकांत 8 बाद 160 (हर्षद खडीवाला 58, प्रसाद पाटील 28*; दीपक शेट्टी 3/32, सागर मिश्रा 2/31) वि. सीजीएसटी आणि सीई मुंबई झोन -19.2 षटकांत सर्वबाद 133 (सागर मिश्रा 8) , करण वसोदिया 29, अमित धिया 20; प्रसाद पाटील 4/28, यशसिंग 3/18). निकाल: मफतलाल सीसी २७ धावांनी विजयी.
०००००