कल्याण : कल्याण डोंबिवली पालिकेच्या माजी नगरसेविका वैशाली दरेकर-राणे यांना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खासदार पुत्र डाॅ. श्रीकांत शिंदे यांच्याविरोधात उमेदवारी दिली आहे. उमेदवारीच्या चर्चेत ठाकरे गटाकडून दरेकर यांचे नाव कधीही चर्चेत नव्हते. पूर्वाश्रमीच्या मनसेच्या नगरसेविका राहिलेल्या दरेकर त्याच पक्षाकडून २००९ साली लोकसभा निवडणुकही लढल्या होत्या. कल्याण डोंबिवलीत पालिकेत डोंबिवली विभागातून गोग्रासवाडी भागातून वैशाली दरेकर यांनी मनसेच्या नगरसेविका म्हणून काम पाहिले. त्या विरोधी पक्षनेत्या होत्या. महिला आणि बालकल्याण समितीचे सभापती पद त्यांनी भुषविले होते.