नवी दिल्ली- दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर जामिनासाठी त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. काल संजय सिंग यांना सुप्रीम कोर्टाने कथित मद्य धोरण घोटाळाप्रकरणात जामिन दिल्यामुळे आम आदमी पार्टीच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. दोन्ही बाजूंकडून आज जोरदार युक्तीवाद करण्यात आले पण अखेर सायंकाळी उच्च न्यायालयाने यावरील आपला निर्णय राखून ठेवला आहे.

ईडीने अरविंद केजरीवाल यांना २१ मार्चला रात्री ९ च्या सुमारास अटक केली. या अटकेविरुद्ध आम आदमी पक्षाने रातोरात थेट सुप्रीम कोर्टात धाव घेतली. मात्र 22 मार्चला केजरीवालांनी सुप्रीम कोर्टातील याचिका मागे घेत, हायकोर्टातच लढण्याची भूमिका घेतली. केजरीवाल यांना ईडीने अटक केल्यावर पहिल्यांदा सात दिवसांची ईडी कोठडी ठोठावली आहे. त्यानंतर त्यांना १५ दिवसांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती. याविरुध्द त्यांनी दाद मागितली आहे. दरम्यान काल सहा महिन्यानंतर जामिन मिळालेल आपचे नेते संजय सिंग यांची सायंकाळी उशीरा जेलमधून सुटका करण्यात आली. संजय सिंग यांच्या सुटकेमळे आप कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावले आहे.. दरम्यान  दिल्लीतील मद्य धोरण आणि कथित घोटाळाप्रकरणात अंमलबजावणी संचलनालय अर्थात

दरम्यान केजरीवालांच्या या अटकेवर देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर आम आदमी पक्ष आणि दिल्ली सरकार नेमकं चालवणार कोण, ते चालणार कसं हे प्रश्न उपस्थित झाले आहेत. कारण अरविंद केजरीवाल हे अटक झालेले आपचे पहिलेच नेते नाहीत, त्यांच्या आधी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, माजी आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन हे नेते कोठडीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *