एकनाथ शिंदे गटात भूकंप
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत भूकंप झाला आहे. लोकसभेच्या जाहिर झालेल्या जागांत आतापर्यंत तीन खासदारांचा पत्ता कट झाला आसून आणखिन दोन खासदाराचाही गेम जवळपास निश्चित झाला आहे. शिवसेनेतील बंडानंतर १३ खासदार उध्दव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदेसोबत आले होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 28 मार्च रोजी त्यांच्या आठ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली, पण त्यावरून आता पक्षाअंतर्गत संतप्त पडसाद उमटत आहेत. हिंगोलीचे हेमंत पाटील आणि यवतमाळच्या भावना गवळींचा पत्ता कट करण्यात आला आहे. रामटेकच्या कृपाल तुमाने यांना आधीच डच्चू देण्यात आला आहे. हिंगोलीमधून हेमंत पाटील तर यवतमाळमधून भावना गवळी उमेदवारी जाहीर केल्यानंतर त्यांची उमेदवारी मागे घेण्याची नामुष्की आली आहे. हिंगोलीमध्ये बाबुराव कदम कोहळीकर यांना तिकीट देण्यात आलं आहे. तर यवतमाळमध्य हेमंत गोडसे यांची पत्नी राजश्री पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता नाशिकच्या हेमंत गोडसे आणि हातकणंगल्याच्या धैर्यशील
लोकांच्या असलेल्या नाराजीच्या अहवालाचा संदर्भ देत हिंगोलीतील हेमंत पाटील आणि हातकणंगल्यातील धैर्यशील मानेंच्या उमेदवारीला भाजपने विरोध केला होता.
निवेदिता माने आणि राजश्री पाटलांना संधी
धैर्यशील माने यांच्या जागेवर त्यांच्या आई निवेदिता माने यांना संधी देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे हेमंत पाटील यांची उमेदवारी मागे घेऊन त्यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना यवतमाळ वाशिममधून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे यवतमाळच्या विद्यमान खासदार भावना गवळी यांचे तिकीट आपोआप कापण्यात आलं आहे. भावना गवळी या यवतमाळमधून पाच वेळा खासदार म्हणून निवडून आल्या आहेत.
गजानन किर्तीकरांना तिकीट नाही
वायव्य मुंबईचे खासदार गजानन किर्तीकर यांनी वयाचं कारण देत निवडणूक न लढण्याची भूमिका घेतली आहे. त्यांच्या ठिकाणी अभिनेता गोविंदाला संधी देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. वायव्य मुंबईतून ठाकरे गटाकडून गजानन किर्तीकर याचे सुपुत्र अमोल किर्तीकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
हेमंत गोडसेंना संधी नाहीच?
भावना गवळींचं तिकीट कापल्यानतंर आता नाशिकच्या हेमंत गोडसेंचंही तिकीट कापण्यात येणार असल्याची चर्चा आहे. त्यावरही लवकरच निर्णय होईल अशी माहिती आहे.
अडचणीच्या काळात ठाकरेंची साथ सोडून आपण तुमच्यासोबत आलो, पण आता उमेदवारीसाठीही झगडावं लागतंय अशी भावना सध्या या खासदारांची आहे. त्यामुळे ज्यांच्या नावावर भाजपकडून फुली मारण्यात आली आहे ते विद्यमान खासदार एकनाथ शिंदेंवर नाराज असल्याचं चित्र आहे.
भावना गवळी यांचा आक्रमक पवित्रा!
सर्वेक्षणाचा निकाल काहीही असो पण मी गेल्या अनेक वर्षांपासून यवतमाळ वाशिममधून निवडून येत आहे. या मतदारसंघात माझी मोठी ताकद आहे. त्यामुळे मी पुन्हा यवतमाळ लोकसभा मतदारसंघातून निवडून येऊ शकते, असे भावना गवळी यांचे म्हणणे होते. मी यवतमाळ-वाशिम मतदारसंघावरील दावेदारी अद्याप सोडलेली नाही. मी आता माझ्या मतदारसंघामध्ये परत जात आहे. मी यवतमाळ-वाशिममधून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे, असे भावना गवळी यांनी सांगितले.
