अशोक गायकवाड

रायगड : भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी ३२ रायगड आणि ३३ मावळ लोकसभा मतदार संघातील ७ विधानसभा मतदार संघनिहाय मतदान केंद्रानुसार ई व्ही एम हीव्हीपॅट यंत्राची प्रथम सरमिसळ आज जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आली. ही प्रथमस्तरीय सरमिसळ (रॅण्डमायझेशन) प्रक्रिया भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार पूर्ण झाल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी किशन जावळे यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी किशन जावळे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहा उबाळे, उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर खुटवड तसेच इतर वरिष्ठ अधिकारी आणि राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत निवडणूक आयोगाच्या देखरेखीखाली ऑनलाईन पध्दतीन ही सरमिसळ करण्यात आली.जिल्ह्यातील मतदार संख्येच्या प्रमाणानुसार २ हजार ७१९ मतदान केंद्र आहेत. सध्या रायगड जिल्ह्यासाठी ६ हजार ७८० बॅलेट युनिट, ३ हजार ७७४ कंट्रोल युनिट तर ३ हजार ९५२ व्हीव्हीपॅट उपलब्ध आहेत. या सर्व विधानसभा मतदार संघात मतदान केंद्राच्या १३८ टक्के बॅलेट आणि कंट्रोल युनिट वाटप करण्यात येणार आहे. तर १४५ टक्के व्हीव्हीपॅट वाटप करण्यात येणार आहेत. प्रत्येक मतदार संघनिहाय मतदान यंत्र, कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅट मशिन देण्यात येणार आहे. सध्या ही यंत्र जिल्हास्तरावर स्ट्रॉँगरूम मध्ये आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *