अशोक गायकवाड
रत्नागिरी : मतदार जनजागृतीसाठी रविवारी सायकल रॅलीत सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी केले आहे.
मतदान जनजागृती करण्यासाठी ‘स्वीप’ अंतर्गत मतदार जनजागृतीकरिता जिल्हा प्रशासनाच्यावतीने रविवार दि. ७ एप्रिल रोजी सकाळी ६.३० वा. पोलीस मैदान येथून सायकल रॅली चे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीमध्ये शासकीय, निमशासकीय कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी केले आहे. रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी दि. ६ एप्रिल, ४ वाजेपर्यंत नाव नोंदणी करावी. या रॅलीसाठी जिल्हाधिकारी सिंह, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी सहभागी होणार आहेत. अधिक माहितीसाठी जिल्हा नियोजन समिती लेखाधिकारी उमेश मगदूम यांना संपर्क-९१७२७०९१७२ करावा.
