माथेरान : एमएमआरडीएच्या माध्यमातून मुख्य रस्त्यावर पर्यावरण पूरक क्ले पेव्हर ब्लॉक लावण्यात आले होते परंतु त्यातील काही निकृष्ट दर्जाच्या ब्लॉक्समुळे रस्त्याला जागोजागी खड्डे पडले होते त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करताना अनेक पर्यटक पडून जखमी झाले होते तर याच रस्त्यावरून वाहतूक करणाऱ्या साधनांना देखील त्रासदायक बनले होते याकामी येथील जागरूक नागरिक सामाजिक कार्यकर्ते राकेश कोकळे यांनी मुख्याधिकारी यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला होता अखेरीस त्यांच्या निवेदनाची दखल घेऊन मुख्याधिकारी राहुल इंगळे यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून या रस्त्यावर नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांमार्फत माती आणि खडी मध्ये हे खड्डे बुजवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.

माथेरान मध्ये विकास कामे होत असताना ती कशा पद्धतीने पूर्ण केली जात आहेत ठेकेदार कामाला दर्जा देत आहे की नाही याबाबत नागरिकांनी सुद्धा जागरूक असणे गरजेचे आहे अनेकदा ठेकेदार कामांमध्ये चालढकल करत असतात कामे लवकरच आटोपून बिले काढण्याची घाई असल्यामुळे कामे तकलादू होत असतात यासाठी नागरिकांनी होत असलेल्या कामांवर बारकाईने लक्ष ठेवणे गरजेचे असल्याचे राकेश कोकळे यांचे म्हणणे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *