काँग्रेसचा सनसनाटी दावा
बंगळूरु: काँग्रेसने आज भाजपावर खळबजनक आरोप केला आहे. तपास यंत्रेणेकडून म्हणजेच ‘एनआयए’कडून बंगळुरु बॉम्बस्फोट प्रकरणात भाजप कार्यकर्त्याला ताब्यात घेण्यात आलं आहे, असा दावा काँग्रेसने केला आहे. काँग्रेसच्या अधिकृत ट्वीटर हँडलवरुन याबाबतचे दावे करण्यात आले आहेत. रामेश्वरम कॅफे येथे झालेल्या स्फोट प्रकरणी ही कारवाई करण्यात आली असल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे.
काँग्रेसने आपल्या ट्वीट मध्ये म्हटले आहे, “1 मार्च रोजी बंगळुरुच्या रामेश्वरम कॅफेमध्ये ब्लास्ट झाला होता. या ब्लास्टमध्ये 10 पेक्षा जास्त लोक जखमी झाले होते. आता या प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेने म्हणजेच एनआयने भारतीय जनता पक्षाच्या नेत्याला ताब्यात घेतले आहे. याचे कनेक्शन स्फोटाशी आहे. दहशतवादी कारवायांत भाजप कनेक्शन का असतात?”, असे दावे काँग्रेस पक्षाने ट्वीटरच्या माध्यमातून केले आहेत.
दहशतवादी कृत्य असल्याने आम्ही साक्षीदारांची नावे किंवा त्यांची ओळख उघडपणे सांगणार नाहीत. कारण त्यांची ओखळ सांगितल्यास तपासात अडचणी येऊ शकतात. शिवाय, काही बातम्याही या प्रकरणावर प्रभाव पाडू शकतात. त्यामुळेही तपासात अडचणी येतील. त्यामुळे फरार आरोपीच्या अटकेबाबत सर्वांनी सहकार्य करावे, असं आवाहन राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून करण्यात आले आहे.
एनआयएने नुकतेच रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य सूत्रधार मुसावीर शाजिब हुसेनला अटक केली होती. एनआयएच्या पथकांनी कर्नाटकातील 12, तामिळनाडूतील 5 आणि उत्तर प्रदेशातील एका ठिकाणासह एकूण 18 ठिकाणी कारवाई केली. तपास यंत्रणेने या प्रकरणातील आणखी एक सहसूत्रधार अब्दुल मतीन ताहा याचा शोध सुरु केला आहे,
