रायगडच्या बबन, गणेशची निवड
मुंबई : येत्या ८ ते १२ एप्रिल दरम्यान पॉवरलिफ्टिंग इंडियाच्या वतीने हैदराबाद येथे आयोजित करण्यात येणाऱ्या ‘क्लासिक सीनियर पॉवरलिफ्टिंग’ स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात रायगडच्या बबन बाबू झोरे (वाघेश्वर- कर्जत, जे व्ही आर जिम)आणि गणेश संजय तोटे (फिटनेस ऑन जिम, तक्का – पनवेल) यांची निवड झाली आहे. या स्पर्धेत १५० पेक्षा जास्त पुरुष आणि १०० पेक्षा जास्त महिला खेळाडूंचा सहभाग अपेक्षीत आहे. त्यांच्या निवडीबाबत बबन झोरे यांना जे व्ही आर फिटनेसचे संचालक विनोद येवले (कर्जत) आणि गणेश तोटे यांना प्रमोद विजय पवार (फिटनेस ऑन जिम, संचालक, पनवेल) यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. बबन, गणेश यांना प्रशिक्षक विशाल मुळे यांचे मार्गदर्शन मिळत आहे. पॉवरलिफ्टिंग स्पोर्ट्स असोसिएशन रायगडच्यावतीने अध्यक्ष गिरीश वेदक, कार्याध्यक्ष यशवंत मोकल, सहसचिव सचिन भालेराव, सदस्य सुभाष टेंबे, संदीप पाटकर, खजिनदार राहुल गजरमल यांनी अभिनंदन करून राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. दोन्ही खेळाडूंनी राज्य स्पर्धेत चांगली कामगिरी केली असल्यामुळे ते पदक विजेते होतील असा विश्वास माधव पंडित यांनी व्यक्त केला आहे.
