शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्या आणि माजी मंत्री मीनाक्षी पाटील यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. रायगड जिल्ह्यातील पेझारी या त्यांच्या मूळ गावी जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. तसेच त्यांच्या कुटूंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटील, आमदार भरतशेठ गोगावले, आमदार महेंद्र थोरवे तसेच शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते आणि पाटील कुटूंबातील सदस्य उपस्थित होते.
