स्वाती घोसाळकर

गुढीपाडव्याच्या दोन दिवस आधी अखेर मुंबई इंडियन्सने विजयाची गुढी उभारली. दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खेळताना मुंबई इंडियन्सने या मौसमतला आपला पहिला विजय नोंदवला. याचबरोबर कर्णधार हार्दिक पंड्यानेही सुटकेचा निश्वास सोडला. मुंबईच्या २३५ धावांचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सची अख्खी टीम २०५ धावांत गारद झाली. खरं तर मुंबई इंडियन्ससाठी हा विजय महत्वाचा होता. कारण या मौसमात मुंबई इंडियन्समध्ये बरेच बदल झालेत. खासकरून मुंबईचं कर्णधारपद हार्दिक पंड्याकडे गेल्यानंतर त्याला अनेक टीकांना सामोरं जावं लागलं होतं. त्यामुळे मराठी नवीन वर्ष सुरू होताना हा विजय मुंबई इंडियन्ससाठी सुखाचा तर नक्कीच आहे.

मुंबईच्या २०५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीने सुरुवात तर आक्रमक केली. पृथ्वी शॉने डेविड वॉरनेरच्या साथीने चांगली सुरुवात केली. पण डेविड वॉरनेर लवकर बाद झाला. पण दिल्ली कॅपिटल्सची झुंज सुरू होती. पृथ्वी आणि अभिषेक पोरेलने दिल्लीचा धावफलक हलता ठेवला. पण त्यानंतर कमाल केली टी जसप्रीत बूमराहने. बूमरॅंग बूमराहने पहिल्यांदा घातक पृथ्वी शॉ आणि त्यानंतर अभिषेकची विकेट घेत दिल्लीच्या घौडदौडलीला खिंडार पाडलं. त्यानंतर दिल्ली पुन्हा सावरु शकली नाही. शेवटच्या ओव्हरमध्ये गेराल्ड कॉटझीने दिल्लीच्या तीन फलंदाजांना बाद केलं.  आणि अखेर २० ओव्हरमध्ये दिल्ली कॅपिटल्स २०५ धावांच करू शकली.

त्याआधी मुंबई इंडियन्सने दिल्ली कपिटल्सने टॉस जिंकून प्रथम बोलिंगचा निर्णय घेतला. मात्र रोहित शर्मा आणि इशान किशनने मुंबई इंडियन्सला चांगली सुरुवात करून दिली. रोहित हाफ सेंचुरी मारणार असं वाटत असताना अक्सर पटेलने ४९ धावांवर त्याला बाद करत मुंबईला मोठा धक्का दिला. त्यानंतर लगेचच सूर्यकुमार यादव आणि इशान किशनला पॅव्हेलियनमध्ये पाठवत मुंबईची पडझड सुरु ठेवली.       कर्णधार हार्दिक पंड्या आणि टीम डेविडने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण दिल्लीच्या अचूक माऱ्यापुढे मुंबईला अपेक्षित स्कोअर करता आला नाही. फक्त शेवटच्या ओव्हरमध्ये रोमारीओ शेफर्डच्या आक्रमक बॅटिंगमुळे मुंबई इंडियन्सने पाच विकेट गमावत २३४चा पल्ला गाठला. रोमारीओने अवघ्या १० चेंडूत नाबाद ३९ धावा केल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *