पिंपरी: मराठा आरक्षणास विरोध करणाऱ्या प्रत्येकाचा हिशेब या लोकसभा निवडणूकीत चुकता केला जाईलच, त्यात जर छगन भुजबळ लोकसभा निवडणूक लढविणार असतील तर त्यांना इंगा दाखवितोच अशा शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी भुजबळांना इशार दिला.

पुढील दोन महिने आपल्याकडे पोळा आहे. पोळा सुरु झालाय भुलून जाऊ नका. कोणाच्याही सभेला जायचं नाही कोणाचाही प्रचार करायचा नाही. मुलाबाळांचे भविष्य डोळ्यासमोर ठेवा. जो आपल्या मुलांचा तो तो आपला, असे परखड मत मराठा समाजाचे नेते मनोज रंगे पाटील यांनी रुपीनगर तळवडे येथे व्यक्त केले.

रुपीनगर तळवडे येथील मराठवाडा युवा मंच अखंड हरिनाम सप्ताह आयोजित केला आहे. रविवारी सकाळी साडे दहाला त मनोज जरांगे पाटील यांनी भेट दिली. तळवडे कडून रुपीनगर कडे जाणाऱ्या रस्त्यावरून ज्योतिबानगरपर्यंत मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.

जरांगे पाटील म्हणाले,  आजचे व्यासपीठ हे वारकरी संप्रदायाचे व्यासपीठ आहे. त्यामुळे आज या व्यासपीठावर मी कोणत्या जाती धर्माचं बोलणार नाही. खरे तर, हा देहू आळंदीचा परिसर हा पवित्र परिसर आहे. या ठिकाणी मला बोलावलं त्याबद्दल सर्वांचे आभार. वारकरी संप्रदाय हा असा एकमेव सांप्रदाय आहे की त्या संप्रदायामध्ये सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन वाटचाल करत असतात. त्यामुळे आज मी एका जातीचं बोलणार नाही. सर्वधर्मसमभावाचा मूलमंत्र वारकरी संप्रदायाने दिला आहे. वारकरी संप्रदायाचा आहे. मलाही वारकरी संप्रदायाचा अभिमान आहे तसेच  हिंदू धर्माचा गर्व आणि अभिमान आहे. गरिबांच्या गोरगरिबांच्या लेकरांच्या चेहऱ्यावर हास्य आनंद आणण्यासाठी माझा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे सर्वांनी एकजूट राहू द्या. वारकरी संप्रदायातील सर्व महाराज किर्तन प्रवचनांमधून आपली भूमिका मांडत आहेत. पाठीशी आहेत. त्यामुळे आपण कोणालाही घाबरण्याचं कारण नाही समाजात एकजूट ठेवा.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *