ओवळा माजीवडा मतदारसंघातील लोकांनी २००९, २०१४ व २०१९ असे तीनदा मला प्रचंड मताधिक्याने निवडून विधानसभेत निवडून पाठविले. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी २२ महिन्यापूर्वी एक फार मोठा निर्णय घेवून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवी व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत राज्याचा विकास करण्याची मोहीम आखलेली आहे. याद्वारे  जास्तीत जास्त निधी देऊन माझ्या मतदारसंघातील विकास कामे कशी वेगाने होतील याची दक्षता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी घेतली आहे. आपला पक्ष महायुती पक्ष आणि आपला उमेदवार म्हणजे नरेंद्र मोदी आहेत. आनंद दिघे यांच्या ठाणे जिल्ह्यावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विशेष प्रेम होते. यामुळे गेली ३० ते ३५ वर्षे ठाणे जिल्हा हा फक्त भगवा राहिलेला आहे. याची सगळी जबाबदारी धर्मवीर आनंद दिघेसाहेबांनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी घेतली आहे. शाखाप्रमुख, नगरसेवक आमदार ते मुख्यमंत्री म्हणून कारभार स्विकारल्यापासून २२ महिन्यात त्यांनी केलेल्या कामांमुळे ते राज्यात व देशात लोकप्रिय झालेले आहेत. ठाण्यातील टीपटाॅप प्लाझा, मिरा-भाईंदर येथील लता मंगेशकर नाटय़गृह व आता काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे मेळावा घेतल्याने कार्यकर्त्यामधला ओसंडून वाहण्याची शक्ती किती आहे हे तीनही मेळाव्याच्या माध्यमातून आपण दाखवून दिले आहे. ही तशीच शक्ती तशीच ताकद आपल्याला ४५ प्लस खासदार निवडताना दाखवून द्यायची आहे. कोणीही उमेदवार असेल तो आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत या माध्यमातून आपल्याला प्रचार करायचा आहे. आणि जो कोणी उमेदवार असेद त्याला निवडून आणण्याची ताकद आपल्या सगळ्यांमध्ये आहे.गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये आपण ४ लाख १० हजाराचे मताधिक्य मिळविले होते पण या निवडणुकीत आपल्याला ५ लाखापेक्षा अधिक मताधिक्य मिळवून देऊ, असा विश्वास आमदार प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *