विशेष

राजेंद्र साळसकर

साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणून गुढीपाडवा या सणाला आपल्या हिंदू धर्मात अनण्यसाधारण असे महत्व आहे۔चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढीपाडवा असे म्हटले जाते۔हिंदू परंपरेनुसार चैत्र महिना हा नव्या वर्षाचा प्रारंभ मानला जातो۔या महिन्याची पहिली तिथी चैत्र शुद्ध प्रतिपदा मानली जाते۔ प्रतिपदा या संस्कृत शब्दाचा अपभ्रंंश होऊन प्राकृत भाषेत पाडवा हा शब्द रूढ झाला۔याच दिवशी चैत्र शुद्ध पक्षाच्या प्रथम दिवशी वसंत ऋतुचेही आगमन झाल्याने सर्व सृष्टीदेखील चैत्र पालवीचा साजश्रृंगार करून नववधूप्रमाणे नटलेली असते۔ गुढीपाडवा या सणाची उत्पत्ती अनेक पौराणिक प्रसंगातून सांगितली जाते۔ याचदिवशी ब्रम्ह देवाने चैत्र शुद्ध प्रतिपदेला या चराचर विश्वाची निर्मिती केली असे पुराणात सांगितले आहे۔त्यामुळे या विश्वाचा वाढदिवस आपण या दिवशी पाडव्याच्या रूपाने साजरा करतो۔या सणामागे आणखी एक कथा आहे۔वसू नावाचा एक राजा तपश्चर्या करून खूप यशस्वी झाला۔त्याच्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन स्वर्गातील अमरेंद्राने त्याला चैत्र प्रतिपदेला गौरविले۔ त्यामुळे या दिवशी पाडव्याचा आनंदोत्सव साजरा केला जातो۔
भगवान श्रीविष्णूंनी प्रभू श्रीरामचंद्रांचा अवतार घेऊन चौदावर्षे वनवासानंतर रावण आणि राक्षसांचा पराभव करून त्यांचा वध केला.त्यानंतर त्यांनी चैत्र शुक्ल प्रतिप्रदेच्याच दिवशी म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी अयोध्येत प्रवेश केला۔रावणाच्या त्रासातून मुक्त झाल्यामुळे व श्रीरामाचे आगमन झाल्याने अयोध्या नगरवासी आनंदित झाले۔त्यावेळी अयोध्येतील जनतेने त्यांच्या स्वागतासाठी घरोघरी गुढ्या उभारल्या,तोरण पताका लावून त्यांचे स्वागत केले۔याचदिवशी श्रीरामचंद्रांनी वालीच्या त्रासातून दक्षिणेच्या प्रजेला मुक्त केले होते۔ पार्वती आणि महादेव यांचा विवाह याचदिवशी ठरला अशी कथा आहे۔
याशिवाय शालिवाहनाचीही कथा गुढीपाडव्याशी संबंधित आहे۔शालिवाहन राजाच्या मुलाने सैन्याचे मातीचे पुतळे तयार करून त्यात प्राण फुंकला आणि त्यांच्या माध्यमातून त्याने शत्रूंचा पराभव केला۔त्यामुळे शालिवाहन “शक” सुरू झाला۔ नगरातील लोक चैतन्यहीन, पौरूषहीन आणि पराक्रमहीन बनले होते۔त्यामुळे शत्रूंसमोर त्यांचा टिकाव लागला नव्हता۔ म्हणून मातीपासून निर्मित सैन्य कसे विजयश्री मिळवून देऊ शकते۔ म्हणून शालिवाहनने त्या चैतन्यहीन लोकांमध्येही चैतन्याचा संचार केला۔पौरूष आणि पराक्रम त्यांच्यात जागविला आणि शत्रूला पराजीत केले۔ मातीच्या गोळ्यात जीव भरणे म्हणजे त्यांच्याप्रमाणे अविचल,दूुुर्बल ,थंड़,निर्जीव वस्तूंमध्ये किंवा तशा प्रवृत्तींच्या माणसांमध्ये चैतन्य निर्माण करणे आहे۔या माध्यमातून समाजातील स्वाभिमानाचे अस्तित्व जागृत केले जाते۔
शालिवाहनाची दुसरी एक कथा पैठणच्या शालिवाहन राजाशी संबंधित आहे۔पैठणच्या शालिवाहन राजाने अत्याचारी असणा-या शक लोकांचा पराभव करून त्यांच्या जाचापासून जनतेची मुक्तता केली۔त्याप्रित्यर्थ शालिवाहन शक सुरू झाले۔कालगणनेत शकांचा पराभव करू शकतो तो शालिवाहन आणि ज्याचा पराभव होतो,तो शक असा शब्द वापरण्यात आला आहे۔ हे दोन्ही शब्द वापरण्यात आले आहेत۔शालिवाहन शके ही त्या काळातील नवी कालगणना अस्तित्वात आली۔या निमित्ताने पंचांगांची पूजा करण्यात येते۔पंचांग हे कालमापन आहे۔पंचांग म्हणजे तिथी,वार,नक्षत्र ,योग आणि करण या पाच अंगांची माहिती करून घेऊन त्यांची पूजा केली,तर त्याचा उपयोग वर्षभर होतो,अशी समजूत आहे۔
गुढीपाडवा हा आपला एक मंगलमयी सण आहे۔ होळीनंतर एक वर्षाची अखेर होते आणि गुढीपाडव्यापासून नवीन वर्षाची सुरूवात होते۔योगायोग म्हणजे याच महिन्यात इंग्रजी वर्षातील मार्चमध्ये एका वर्षाची अखेर होते आणि एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्षाची सुरूवात होते۔त्यामुळेच आर्थिकदृष्ट्याही हा काळ अत्यंत महत्वपूर्ण असतो۔
यावर्षी ९ एप्रिलला महाराष्ट्रात गुढीपाडवा साजरा केला जात आहे۔संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात मराठी नवीन वर्षाचे स्वागत केले जाते۔
गुढीपाडवा हा आपल्या महाराष्ट्राचा महत्वाचा सण आहे۔शिवाय या दिवसापासून मराठी नवीन वर्षाला सुरूवात होते۔साहजिकच या नवीन वर्षाचे स्वागत पारंपारिक वेशभुषेने केले जाते۔महिला गुढीपाडव्याच्या दिवशी वेगवेगळया प्रकारचे साडी लूक्स परिधान केलेल्या दिसतात۔महिला यादिवशी खास नऊवारी साडी,नथ,ठुशी असे पारंपारिक दागदागिने घालतात तर पुरूषमंडळी धोती,सलवार,कुर्ता असा पारंपारिक पेहराव करतात۔ महाराष्ट्रात सार्वजनिक ठिकाणी देखील गुढीपाडवा मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो۔रस्त्यावर चौकाचौकात मोठमोठ्या रांगोळ्या काढल्या जातात۔पारंपारिक वेशभुषा केली जाते۔लेझिम,ढोल -ताशे आणि भव्यदिव्य देखावे करून मोठी शोभा यात्रा काढली जाते۔शहरातील सर्व समाजातील लोक यात सहभाग घेतात आणि मराठी नवीन वर्षाचे स्वागत करतात۔ घरोघरी गुढी उभारून, गोडाधोडाचा स्वयंपाक करून सार्वजनिक ठिकाणी गुढीपाडव्यानिमित्त रांगोळया, देखावे,शोभायात्रा काढून एकमेकांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतात आणि मराठी नववर्षाचे स्वागत केले जाते۔
सर्व जातीधर्मातील लोकांना एकत्र आणण्यासाठी गुढीपाडवा हे एक प्रभावी माध्यम आहे۔याच उद्देशाने या शोभायात्रेची सुरूवात लालबागला झाली۔संस्कृती, परंपरा आणि उत्सव आदींचे प्रारूप दर्शविणारे चित्ररथ लालबाग विभागाच्या माध्यमातून शोभायात्रेमध्ये उतरवण्यात आले۔हजारोंच्या संख्येने साजरा होणारा हा उत्सव पुढे दहा ते बारा वर्षे अव्याहतपणे सुरू होता۔परंतु पुढे काही अडचणींमुळे या उत्सवाच्या आयोजनामध्ये खंड पडला۔पण अडचणींवर मात करत गेली पाच वर्षे लालबाग, काळाचौकी, करीरोड,चिंचपोकळी या संपूर्ण गिरणगावच्या माध्यमातून “गिरणगाव सांस्कृतिक प्रतिष्ठान “या नावाने हिंदू नववर्ष शोभायात्रा लालबाग,परळ या गिरणगावात आजतागायत अव्याहतपणे सुरू आहे۔ लालबाग-परळ प्रमाणेच मुंबई शहरातील ,विलेपार्ले नववर्ष स्वागत यात्रा,गिरगाव स्वागत यात्रा,कुर्ला नववर्ष स्वागत यात्रा यासारख्या स्वागत यात्रा प्रतिवर्षी गुढीपाडव्या निमित्ताने निघत असतात۔अनेक वेगवेगळ्या सामाजिक विषयांना वाचा फोडण्याचे काम तसेच हिंदू संस्कृतीचे प्रदर्शन यासारख्या हिंदू नववर्ष शोभा यात्रातून होत असते۔
पूर्वी या दिवसाच्या निमित्ताने घरात नवीन पुस्तकांची खरेदी होत असे۔ वह्या खरेदी केल्या जात असत۔काही घरांमधून हिशेबाची खतावणीदेखील गुढीपाडव्यालाच घेतली जायची۔अनेक लोक गुढीपाडव्यापासूनच दैनंदिनी लिहिण्यास सुरूवात करायचे۔आजही हा रिवाज पाळणारे अनेकजण बघायला मिळतात۔यादिवशी घरामध्ये पंचांगाची पूजा होते आणि आगामी काळाचा अंदाज घेतला जातो۔याचदिवशी अनेकजण नवीन व्यवसायाला प्रारंभ करतात۔नवीन कार,नवीन फ्लॅट,घरातील नवीन इलेक्ट्राॅनिक वस्तू अशा नानाविध प्रकारच्या वस्तूंची खरेदी करतात۔जो तो आपापल्या ऐपतीप्रमाणे सोने खरेदी करतो۔एक ग्रॅम का असेना,पण घेतात۔त्यादिवशी ते महत्वाचे मानले गेले आहे۔ते समृद्धीचे मानले जाते۔गुढीपाडव्याच्या दिवशी अनेकजण शुभ संकल्प करतात۔यादिवशी केलेले संकल्प फलदायी ठरतात असा अनेकांचा अनुभव आहे۔गुढीपाडवा हा सण आपापसातील वैरभाव,मतभेद विसरून शांतता मिळवून देणारा हा आनंददायी असा सण आहे۔
आपल्या देशात पाश्चात्यांचे अनुकरण फार वाढीस लागलेले आहे۔पाश्चात्यांचे करत असलेले अंधानुकरण रोखण्यासाठी सर्वांनीच पुढाकार घेतला पाहिजे निसर्गाच्या जवळ जाण्याचा हा सण असल्याने आपण निसर्गाचे संवर्धन करण्यासाठी संकल्प नक्कीच करू शकतो۔पर्यावरण स्नेही,पर्यायी गोष्टींचा वापर करण्याचा संकल्प आपण करूयात۔समाजातील सर्व अमंगळ गोष्टी,घटनांचे मळभ दूर होऊन नव्या वर्षात सारे काही चैतन्यमयी ,आनंददायी घडो हीच गुढीपाडवानिमित्त सदिच्छा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *