अनेक मान्यवरांच्या उपस्थितित संगीतमय वातावरणात पार पड़ला
मुबंई:- डॉक्टर स्मिता डोंगरे आणि रमेश पूजारी हे दोघे Spreading happiness through music है ब्रीद वाक्य घेऊंन गेली चार वर्ष म्यूज़िक मंत्र हे बैनर खाली अनेक हिंदी मराठी गाण्यांचे कार्यक्रम करत संगीतद्वारे आनंद देण्याचे काम करत आहेत.अनेक वृद्धाश्रम, अनाथालय, अंध विद्यालय या ठिकानी ही आणि खास जेष्ठ नगरीकांसाठी ते आपल्या गाण्यांच्या माध्यमातुन त्यांच्या आनंदी करण्याचा प्रयत्न करतात. अनेक गायक गायिका त्यांच्या सोबत जोडले गेलेले आहेत.
चौथ्या वर्धापन दिनानिमित जेष्ठ पार्श्व गायिका इतनी शक्ति हमें देना दाता फेम पुष्पा पागधारे जी , शायर गीतकार निदा फाजली यांच्या पत्नी मालती फाजली जी तसेच पार्श्व गायक मिलिंद इंगले ,श्रीमती अनुराधाताई कुडाळकर (संगीतकार लक्ष्मीकांत यांच्या वाहिनी ) एसीपी संजय पाटिल सर,एसीपी यश मिश्रा जी यांची उपस्थिति खास होती..
“सुहाना सफर ” या शिर्षकाखाली 29 आणि 30 मार्च या दोनही दिवशी लाइव ऑर्केस्ट्रा सोबत मिताली राउल यानी ओडिसी नृत्य, अनुष्का चतुर्वेदी यानी कथक नृत्यातुन गणेश वंदना सादर केली सादर केली तर प्राची मोहिते हिच्या रंगातदार लावणी नृत्याने सभागृह डोक्यावर घेतले तर 38 गायक गायिकानी आपल्या बहारदार गाण्यांनी रसिक श्रोत्यांच्या उदंड प्रतिसादात हा दोन दिवसंचा सोहोळा आनंदात पार पड़ला . डॉक्टर स्मिता डोंगरे आणि रमेश पूजारी यानी सर्वांचे मानापासून आभार मानले.
