बहुजन महापार्टीचे महासचिव शमसुद्दीन खान यांचा दावा

मुंबई : आज देशात महगाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, शेतकऱ्यांच्या आत्महत्या व गरीबांवर होणारे अन्याय मोठ्या प्रमाणात वाढले असून अशा स्थितीत भाजपने अब की बार ४०० पार चा नारा दिला आहे.आज देशात कोणत्याही एका पक्षाला ४०० सीट निवडून आणणे शक्य नाही evm मध्ये सेटींग केल्यास ते सहज शक्य आहे. evm मध्ये सेटींग करून निर्णय परिणाम बदलले जातात असे अनेक वर्षापासून आरोप होत आहे.त्यामुळे evm बाबतीत देशातील जनतेच्या मनात संभ्रम आहे. evm व vvpat याबाबत आम्ही आपल्या निदर्शनास आणून देवू इच्छितो की, बहुजन महापार्टीची स्थपना सन २०१७ मध्ये झाल्यानंतर आम्ही प्रथम निवडणूक उत्तर प्रदेश मध्ये होणाऱ्या विधानसभेची लढविली होती त्या निवडणुकीत फक्त evm या मशीन द्वारे निवडणूक घेण्यात आली.व निकाल जाहीर झाल्यानंतर आमच्या पक्षाच्या उमेदवाराने आम्हाला सांगितले की, आमच्या कुटुंबातील लोकांनी आम्हाला मतदान केले होते परंतु निकालात ते दिसत नाही त्यामुळे आमच्या उमेदवाराने तक्रार दाखल करण्यास सांगितले असल्याने आम्ही याबाबत बहुजन महापार्टी तर्फे मा.राष्ट्रपती व मा.केंद्रीय निवडणूक आयोग यांना पत्र देवून evm निकालावर  हरकत घेतली होती.त्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई न झाल्याने आम्ही कोर्टात लढा देण्याचे ठरविले.व सर्व निवडणुका  evm व vvpat च्या माध्यमातून घेणेकामी मुंबई उच्च न्यायालयात याचिका क्रमांक ८१८७/२०१७ दाखल केले होते व पारदर्शक निवडणूक घेण्याची विनंती मे न्यायालयात केली होती.त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने vvpat चा वापर करून मतदान घेण्यात येईल व पारदर्शक मतदान होईल याबाबतचे फलक शासकीय कार्यालयाबाहेर लावले होते. केंद्रीय निवडणूक आयोगाने vvpat मशीन खरेदी करणेकामी अंदाजे ५०० कोटी रुपये खर्च करुन देशातील सर्व बुथवर आवश्यक असलेले evm व vvpat मशीन खरेदी केलेली आहे.आज आवश्यकतेपेक्षा जास्त vvpat व evm मशीन केंद्रीय निवडणूक आयोगाकडे उपलब्ध आहे. vvpat मशीन खरेदी करण्यामागे एकच उद्देश होता तो म्हणजे पारदर्शक निवडणूक व पारदर्शक निकाल.परंतु निवडणूक आयोग vvpat slip ची मोजणी का करत नाही याबाबतचा खुलासा निवडणूक आयोगाने करावा ? निवडणूक आयोग कोणाच्या दबावाखाली आहे  का ? पारदर्शक निवडणूक घेवून पारदर्शक निर्णय पारीत झाल्यास लोकशाही आणखीन भक्कम होईल व देशातील जनतेचा विश्वास निवडणूक आयोगावर वाढेल.त्यामुळे माझी सर्व पत्रकार बंधूंना विनंती आहे की, त्यांनी निवडणूक अधिकारी म्हणजेच जिल्हाधिकारी यांना याबाबत विचारणा करावी.व vvpat slip ची मोजणी झाल्यास हरकत काय ? आज देशातील जनतेच्या मनात evm बाबत शंका आहे.निवडणूक आयोगाने  evm मशीन बनविण्याचे ठेका ज्या इसमास दिला गेला आहे तो भाजप या पक्षाचा पदाधिकारी आहे असे आरोप बहुतेक लोक करीत आहेत.त्यामुळे evm या मशीन मध्ये गडबड करुन निकाल बदलला जाऊ शकते असे सर्व नागरिकांचे म्हणणे आहे. निवडणूक आयोगाने अंदाजे ५०० कोटी रुपये खर्च करून vvpat मशीन लावलेले आहे त्याचा उपयोग मतमोजणीसाठी का केला जात नाही ? फक्त evm मशीनची मोजणी करून निर्णय पारीत केले जात असल्याने ५०० कोटी रुपये का खर्च करुन vvpat मशीन का खरेदी करण्यात आली आहे ?  evm मशीनद्वारे जाहीर होणाऱ्या निर्णयास सर्व पक्षातील लोकांनी विरोध केलेला आहे. देशात पारदर्शक निवडणुक व्हावे असे समस्त देशवासीयांची भावना आहे त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोग vvpat slip ची मोजणी करून निर्णय जाहीर केल्यास निवडणुका पारदर्शक झाले आहे हे स्पष्ट होईल. vvpat slip ची मोजणी करून निर्णय जाहीर करण्यास अंदाजे  ५  ते ६ दिवस लागतील व या निकालावर कुणीही आक्षेप घेवू शकत नाही. vvpat slip ची मोजणी करण्यास शासनाचा वाढीव एक रुपयाही खर्च होणार नसल्याने पारदर्शक निवडणूकीचा निकाल लागावे यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने संबंधित सर्व जिल्हाधिकारी म्हणजेच निवडणूक निर्णय अधिकारी यांना याबाबत योग्य ते आदेश द्यावे अशी आमची मागणी आहे व भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी देखील vvpat slip ची मोजणी करण्याबाबत त्यांची भूमिका काय आहे हे स्पष्ट करावे असे बहुजन महापार्टीचे महासचिव शमसुद्दीन खान यांनी बोलताना सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *