ठाणे : ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यकर्त्यांच्या मागे ठामपणे उभा राहतो. चांगली टीम तयार करा, दिवा परिसरात पक्ष बांधणी करा’, असे मार्गदर्शन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी यावेळी केले. आनंद परांजपे यांच्या हस्ते गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर संभाजी ब्रिगेडचे ठाणे महानगर अध्यक्ष सुजय वसंत सावंत यांची ठाणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. यावेळी सुजय सावंतक यांच्यासह संभाजी ब्रिगेडच्या शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
सुजय सावंत यांच्याबरोबर दिवा परिसरातील संभाजी ब्रिगेडचे आयुष जाधव, भूषण शेडगे, गौरव सावंत, राजेंद्र भोसले, रोहन परब, आदित्य पवार, अमोल बोरचटे, दिपेश पवार, विवेक पुपाला, उमेश असावे, महेश गोरीवले, निलेश म्हस्के, दिप्तेश आगटे, प्रशांत जाधव, आकाश पाटील, जयंद्र कदम, अनिरुद्ध वरधे, अक्षय गायकवाड, अक्षय साळवी, अमर पुकाळे, विजय रहाटे, विलास उत्तेकर, अतुल सैती, महेश पालव, राजेश धाडवे, नरेंद्र दाभाडे, आदित्य जाधव आदी कार्यकर्त्यांनी ठाणे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या सर्वांचे प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी हार्दिक स्वागत केले. याप्रसंगी ठाणे जिल्हा सरचिटणीस प्रभाकर सावंत, रविंद्र पालव, सचिव मनोज कोकणे, परिवहन सदस्य नितिन पाटील, विधानसभा अध्यक्ष विजय भामरे, ब्लॉक अध्यक्ष समीर पेंढारे, प्रभाग अध्यक्ष शरद उतेकर, दिवा युवा ब्लॉक अध्यक्ष निलेश कापडणे आदी मान्यवर उपस्थित होते.