राष्ट्रवादी काँग्रेसच्या नववर्ष स्वागत यात्रा
अनिल ठाणेकर
ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मंगळवारी, ९ एप्रिल रोजी गुढीपाडव्यानिमित्त निघालेल्या नववर्ष स्वागत यात्रेवर षुष्पवृष्टी करत नौपाडा व कळवा नाका येथे भव्य स्वागत केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्वागत व्यासपीठाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यांनी आवर्जून भेट दिली.
गुढी पाडव्यानिमित्त ठाणे शहारातील कोपिनेश्वर मंदिर येथून दरवर्षी नववर्ष स्वागत यात्रा काढण्यात येते. मंगळवारी, ९ एप्रिल रोजी, सकाळी ७ वाजता नववर्ष स्वागत यात्रेची सुरुवात झाली. सालाबाद प्रमाणे याहीवर्षी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून, गोखले रोड, नौपाडा, ठाणे (पश्चिम) येथे तसेच कळवा येथील कळवा नाका येथे नववर्ष स्वागत यात्रेवर षुष्पवृष्टी करत स्वागत केले. यावेळी स्वागत यात्रेमध्ये सहभागी नागरिकांना मोफत शीतपेये वाटप करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या या स्वागत व्यासपीठाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यांनी आवर्जून भेट दिली.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक प्रकाश बर्डे, राजनाथ सिंग, ठाणे जिल्हा सरचिटणीस प्रभाकर सावंत, रविंद्र पालव, परिवहन सदस्य नितिन पाटील, विधानसभा अध्यक्ष विजय भामरे, कार्याध्यक्ष निलेश कदम, उथळसर ब्लॉक अध्यक्ष समिर पेंढारे, नौपाडा ब्लॉक कार्याध्यक्ष सुमित गुप्ता, प्रभाग अध्यक्ष साई प्रभू, विवेक गोडबोले, दिनेश दळवी, प्रभाग अध्यक्ष समिर शेख, संतोष घोणे, दिनेश बने, महिला विधानसभा अध्यक्ष अरुणा पेंढारे, सुलर्णा खिल्लारी, महिला खारीगाव ब्लॉक अध्यक्ष पल्लवी गिध, युवती विधानसभा अध्यक्ष सोनिया माने, विद्यार्थी ब्लॉक अध्यक्ष हर्ष चापले आदी १४८ ठाणे विधानसभा व १४९ कळवा-मुंब्रा विधानसभेतील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्यासंख्येने उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून नववर्ष स्वागत यात्रेसाठी ‘स्वागत व्यासपीठ’ बनविण्यात आले होते. या स्वागत व्यासपीठावर महाराष्ट्र वैभव गौरवार्थ चित्र प्रदर्शनाने व डीजेच्या तालावर मराठी सुमधूर गीतांनी वातावरण भारुन गेले होते. स्वागत व्यासपीठावरून स्वागत यात्रेतील नागरिकांना शितपेय वाटप करण्यात येत होते. या स्वागत व्यासपीठाला मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, शिवसेना जिल्हाप्रमुख नरेशजी म्हस्के, माजी आमदार रविंद्रजी फाटक आदी मान्यवरांनी आवर्जून भेट देऊन कौतुक केले.
