मुंबई : मोदी सरकारचे चारशे पारचे उद्दिष्ट सत्यात आले तर ते संविधान बदलतील, असा प्रचार सध्या विरोधकांकडून सातत्याने केला जात आहे. मात्र आता  विरोधकांना कुठलाही मुळ मुद्दा नसल्याने ते अशा पद्धतीचा बोगस आणि अपप्रचार करत आहेत. संविधान बदलण्याची भाषा कुणीही करू नये. जर उद्या अशी परिस्थिती निर्माण झाली तर मी सर्वप्रथम माझ्या मंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याचे थेट इशारा असलेले केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दिलाय. ते आज ते आज गोंदिया येथे आले असता त्यावेळी ते बोलत होते.

भाजपने आपल्या प्रचारासाठी गुंडे आणले असल्याचे असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला होता. यावर भाष्य करताना रामदास आठवले यांनी आपल्या खास शैलीत कवितांमधून उत्तर दिले आहे. ‘आम्ही अजिबात आणत नाही प्रचारात गुंडे, पण काँग्रेसचे येणार आहेत अनेक पैशाचे हंडे’, असे म्हणत आम्ही अजिबात गुंडशाहीच्या उपयोग करत नसल्याचे आठवले पुढे म्हणाले.

शिर्डीच्या जागेवरून रामदास आठवले हे लोकसभेच्या उमेदवारीसाठी आग्रही होते. मात्र, तेथील काही स्थानिक नेत्यांचा मला विरोध होता. मी बळजबरीने उमेदवारी घेऊ शकलो असतो. मात्र मागच्या वेळी जशी माझी शिकार झाली होती, तशीच शिकार यावेळी झाली असती. त्यामुळे मी माघार घेतली असल्याची स्पष्टोक्ती रामदास आठवले यांनी आज माध्यमांशी बोलताना केली.

सोबतच, सांगली लोकसभेच्या उमेदवारावरुन महायुतीमध्ये नाराजीनाट्य सुरू आहे. यावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना प्रश्न केले असता, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने काँग्रेसवर अन्याय केलाय. काँग्रेसने याबाबत  विचार करावा असे वक्तव्य आठवले यांनी केलंय. एवढेच नाही तर काँग्रेसने महाविकास आघाडी मधून बाहेर पडावं, असेही आठवले म्हणाले. ते आज गोंदियात आले असता त्यांनी माध्यमांशी बोलताना हे भाष्य केलंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *