टीजेएसबी बॅकेचा व्यवसाय २५ हजार कोटींवर जाईल – शरद गांगल

अनिल ठाणेकर

ठाणे : दोन ते तीन वर्षांत टीजेएसबी बॅंकेचा व्यवसाय २५ हजार कोटींवर जाईल, नफायुक्त वाढ हे टीजेएसबी बॅंकेचे ब्रिद आहे तेच आपले लक्ष आहे, तेच आपण फॉलो करत आहोत. टीजेएसबी बॅंक भरोसेका बॅंक, भविष्यका बॅंक म्हणून ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरेल, अशी अपेक्षा टीजेएसबी बॅंकेचे अध्यक्ष शरद गांगल यांनी पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केले. यावेळी बॅंकेचे उपाध्यक्ष वैभव सिंघवी, व्यवस्थापकीय संचालिका व मुख्य कार्यकारी अधिकारी सुब्बलक्ष्मी शिराली, तसेच सर्व संचालक, बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे सर्व सदस्य आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
कुठल्यातरी वाढीसाठी वाढ करायची आणि कुठला तरी मोठा नंबर दाखविण्यासाठी टीजेएसबी बॅंक कधीही काही करत नाही, आम्ही नेहमी हे पाहत असतो की, देशाची इकॉनॉमी जेव्हा वाढते त्याच्या एक दोन टक्के आपण इकडे तिकडे वाढलो की आपण सुरक्षित हातात आहोत. ठेविदारांचा इंटरेस्ट हा सर्वात महत्वाचा आहे. इथे सगळे मध्यमवर्गीय व गरिब लोकांचे पैसे आहेत. आपले लक्ष नफायुक्त वाढ हे आपले ब्रिद आहे तेच आपण फाॅलो करत आहोत. दोन ते तीन वर्षांत टीजेएसबी बॅंकेचा व्यवसाय २५ हजार कोटींवर जाईल अशी अपेक्षा आहे. टीजेएसबी बॅंक भरोसेका बॅंक, भविष्यका बॅंक म्हणून ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरेल. वर्षभरात सव्वा दोनशे कोटीचे गृहकर्ज वाटप करण्यात आले. आरबीआयने रिअल इस्टेट कर्जावर रिस्टीक्शन असतात. जास्तीत जास्त वैयक्तिक गृहकर्ज देण्याचा आपला प्रयत्न असतो. पण त्याला १० टक्केची मर्यादा आहे. ही मर्यादा आपण फेब्रुवारी-मार्च मध्येच पूर्ण करतो.आपल्या गृहकर्जाचा व्याजदर सर्वात कमी आहे. गेल्यावर्षी २०९५४ कोटींचा व्यवसाय झाला तो यावर्षी २२४६३ कोटीचा झालेला आहे. गेल्यावर्षी डिपॉझिट १३७४३ कोटी होते ते यावर्षी १४५८८ कोटी झाले आहे. ढोबळ नफा २९१ कोटी होता तो २८० कोटी झालेला आहे. नेट प्राॅफिट १७३ कोटीवरुन २१६ कोटी झालेला आहे. स्वनिधी १५४९ कोटीवरुन १७१९ कोटी झालेले आहे. बँकेचे आरोग्य पहाणारा स्वनिधीचे शेअर कॅपिटल १०९ कोटी आहे.तर स्वनिधी १७१९ कोटीवर गेले आहे. रिझर्व्ह बॅंकेचे बारीक लक्ष असते तो कॅपिटल ॲडक्विन्सी रेषो, बॅंकेचे आरोग्याचे प्रमाण १६. ९३ टक्क्यावरुन १७.५७ टक्क्यांवर आलेले आहे.हे ऑडिटेट फायनान्शियल रिझल्ट्स आहेत. हा बॅंकेचा आर्थिक ताळेबंद आहे. रिझर्व्ह बॅंकेने फिनान्शली स्ट्राँग ॲण्ड वेलमॅनेज बॅंक म्हणून दर्जा दिल्याने ऑटोमोटिव्ह रुटने बॅंक शाखा आपण उघडू शकतो. यानुसार पहिली शाखा गोवा येथे तर उरलेल्या चार शाखांपैकी तीन एप्रिल शेवटपर्यंत उघडण्यात येतील तर एक शाखा जून मध्ये उघडण्यात येईल. पहिल्या तिमाहीत चार शाखा उघडण्यात येणार आहेत. यामुळे आपण पाच शाखांपैकी दोन शाखा कर्जत (रायगड) आणि वाळूज छत्रपती संभाजी नगरव येथे शाखा उघडण्यात येणार आहेत. पुणे जिल्ह्य़ातील मोशी व बारामती येथे एक नागपूर येथे शाखा उघडण्यात येतील. कॅन्सर हॉस्पिटलमधील रुग्णांच्या मदतीसाठी एटीएम टाकलेले आहे. नवीन तीन शाखांपैकी चौथी ठाणे शहरात घोडबंदर आनंद नगर येथे उघडण्यात येणार आहे. बॅंकेची वाढ अशीच चालू राहिल. बॅकेच्या मजबूतीसाठी काही भविष्यातील तरतुदी करुन ठेवलेल्या आहेत. ग्राॅस एनपीए कमी तर नेट प्राॅफिट वाढलेला आहे. बॅंक च्या १३९ शाखा, महाराष्ट्र, गुजरात, गोवा, कर्नाटक, मध्य प्रदेश येथे कार्यरत आहेत.उत्तर भारतातील नोएडा सारख्या परिसरात खूप मोठ्याप्रमाणात व्यवसायवृद्धी होत आहे. यामुळे जिथे बिझनेस असेल तिथे आम्ही जाणार आहोत. पूर्ण उत्तर भारत आमच्या नियोजनात आहे, असे मत टीजेएसबी बॅंकेचे अध्यक्ष शरद गांगल यांधी व्यक्त केले.
चौकट
टीजेएसबी बॅंकेला इंडियन बॅंक टॅक्स असोसिएशन कडून तीन पुरस्कार, बेस्ट बॅंक सेल्स, पेमेन्ट ॲण्ड एन्गेजमेंट, बेस्ट टेकटॅलेन्ट ॲण्ड ऑर्गनायझेशन, बेस्ट टेक्नॉलॉजी बॅंक ऑफ द ईअर असे प्रतिष्ठित पुरस्कार टीजेएसबी बॅंकेला प्राप्त झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *