ठाणे : बोरिवली क्रिकेट क्लबने युनायटेड क्रिकेट क्लबचा सहा गडी राखून तर स्पीड स्पोर्ट्स क्लबने गोल्डन स्टार क्रिकेट क्लबचा पाच गडी राखून पराभव करत स्पोर्टींग क्लब कमिटीने शताब्दी वर्षात ठाणे महानगरपालिका क्षेत्र मर्यादित टी- २० क्रिकेट स्पर्धेत विजयी सलामी दिली. ठाण्याचे जेष्ठ क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक मुकुंद सातघरे यांनी प्रारंभी यष्टीपूजन करून स्पर्धेचे रीतसर उदघाटन केले. या प्रसंगी स्पोर्टींग क्लब कमिटीचे कार्यकारिणी सदस्य सुशील म्हापुस्कर, जेष्ठ क्रिकेटपटू आणि क्रीडा संघटक प्रल्हाद नाखवा, क्रिकेट प्रशिक्षक आशिष मोरणकर, दीपक पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
संक्षिप्त धावफलक : धी युनायटेड स्पोर्ट्स क्लब : १९.३ षटकात सर्वबाद ११७ ( आशिष काळेकर ४१, प्रणव ठाणेकर १९,संदीप दहाड १.३-०-६-३, चेतन जाधव ४-०-१०-२, सुमित पेडणेकर ४-०-२१-१) पराभूत विरुद्ध बोरिवली क्रिकेट क्लब : १६.३ षटकात ४ बाद १२० ( रोमीर हिरे नाबाद २९,आदित्य शेळके २६, स्वप्नील नाखवा ४-०-१६-२, तनिष्क कोळी ३-०-१८-१)
गोल्डन स्टार क्रिकेट क्लब : २० षटकात८ बाद ११८ ( तन्मय महाडिक २४, चिन्मय शेट्टी ४-०-२३-२) पराभूत विरुद्ध स्पीड स्पोर्ट्स क्लब : १४.२ षटकात ५ बाद १२० ( पियुष खारपूर ६५, विवेक सामगर ३३, संजय महाडिक ४-०-२२-२)
