ठाणे : गुडीपाडव्याच्या मुहुर्तावर राज ठाकरे यांनी शिवतिर्थावर भाजपाला मनसे पाठींबा जाहिर करताच मनसे कार्यकर्ते आणि भाजपातील उत्तर भारती मतदारांत अस्वस्थता पसरलीय. मनसेने भाजपला बिनशर्त पाठिंबा दिल्याची घोषणा केल्यानंतर अनेक ठिकाणी राजीनामानाट्य सुरू झाले आहे.
मीरा भाईंदर येथील भाजपचे उत्तर भारतीयांचे प्रतिनिधीत्व करणारे ब्रिजेश तिवारी आणि त्यांच्यासोबत ४० ते ५० भाजप कार्यकर्त्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मातोश्री येथे शिवबंधन बांधून भगवा हाती घेतला.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस किर्तीकुमार शिंदे यांनीही फेसबूकवरून आपल्या पदाचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय. फेसबूक यांची ही पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे.
दरम्यान, राज ठाकरे यांनी भाजपला दिलेल्या पाठिंब्यामुळे भाईंदर येथील उत्तर भारतीय लोक नाराज झाले असून आमच्या जखमा अजून ताज्या आहेत. म्हणूनच आम्ही हा निर्णय घेतल्याचे बिज्रेश तिवारी यांनी सांगितले.