माथेरान : उन्हाच्या झळा वाढत असताना माथेरानचे पर्यटन बहरत असते परंतु यावर्षी अजूनही माथेरानकडे पर्यटकांनी पाठ फिरवल्याने येथील व्यवसायिकांमध्ये चिंता पसरली असून सध्या सुरू असलेल्या आयपीएल, लोकसभा निवडणूक व रमजान महिन्यामुळे माथेरानमध्ये पर्यटनची संख्या घटली असल्याचे प्राथमिक मत येथील व्यवसाय बोलत आहे.
परीक्षा हंगाम संपताच माथेरान मध्ये पर्यटकांची गर्दी व्हायला सुरुवात होते होळीनंतर सुरू होणाऱ्या गर्मीला दिलासा म्हणून माथेरान कडे पर्यटकांची पावली आपोआप वळू  लागतात परंतु यावर्षी अजून पर्यंत माथेरानमध्ये शुकशुकाट असल्याने येथील व्यवसायिक आर्थिक चिंतेत असल्याचे दिसून येते पर्यटन हंगाम सुरू होण्याअगोदर पर्यटकांना आकर्षित करण्याकरता अनेकांनी मोठ्या प्रमाणात खर्च केल्याने या कर्जाचे हप्ते भरताना येतील व्यावसायिक चिंतेत दिसून येत आहे.
मागील चार-पाच वर्षांमध्ये माथेरान मध्ये अशाच प्रकारे पर्यटन हंगाम जात असल्याने मोठा चिंतेचा विषय आहे झाला आहे काही वर्षांपूर्वी परीक्षा सुरू होतात 15 जून पर्यंत येथील पर्यटन हंगाम चालत असेल परंतु मागील काही वर्षांमध्ये येथल पर्यटनाला घरघर लागलेली दिसून येत आहे येथे येणाऱ्या पर्यटकांमध्ये उच्चभ्रू ू पर्यटकांमध्ये घट झाली असून मध्यमवर्गीय पर्यटक वाढल्याने अनेक वचन पर्यटन माथेरान कडे पाठ फिरू लागल्याने त्याचा फटका येतील बाजारपेठेतील व्यवसाय व हॉटेल व्यवसायिकांना होत आहे तर मध्यमवर्गीय पर्यटक वाढल्याने त्याचा फायदा येथील टॅक्सी, टॅक्स व टपरी सारख्यांना होत आहे. मध्यमवर्ग पर्यटक वाढल्याने टॅक्सी चालक प्रवासी कर व टपरी वरती खानपान व्यवस्था यांच्या धंद्यात भरभराट झाली आहे परंतु मोठे व्यवसाय मात्र यापासून वंचित आहेत.
काही वर्षांपूर्वी येथे येणारे खर्च करणारे पर्यटक आता कमी होऊ लागले आहे अनेक हॉटेल व्यवसायिक येथे आपल्या मालमत्ता विकून जात असल्याचे चित्र आहे तर अनेक बंगले धारक ही आता पूर्वीसारखी येत नसल्याने त्यांच्यावरती पारंपरिक व्यवसाय करणारे अश्वचालक व दुकानदार यांना त्याचा फटका बसू लागला आहे, काही प्रमाणामध्ये माथेरान मध्ये होत असलेली पर्यटकांची फसवणूक ही ह्यास जबाबदार आहे वही फसवणूक सुरू झाल्यापासूनच येतील पर्यटनामध्ये हळूहळू घट सुरू झाल्याचे दिसू लागले असून माथेरान कडे शासनाचे असलेली वक्रदृष्टीही त्यास कारणीभूत आहे कारण येथील घाटामध्ये होत असलेली प्रचंड वाहतूक कोंडी मुळे पर्यटक त्रस्त होत आहेत तर वाहन स्थळासाठी असलेली अपुरी जागा व त्यामुळे पर्यटकांना नेहमीच वाहतूक कोंडी सामोरे जावे लागत असल्याने पर्यटक येथे येण्यास पुन्हा धजावीत नाहीत परंतु अनेक वर्ष प्रयत्न करूनही शासन मात्र याकडे दुर्लक्ष करत आलेले आहेत व हळूहळू त्याचे दुष्परिणाम आता दिसू लागले असून आयपीएल सुरू झाल्यापासून तर माथेरानचे पर्यटन मे महिन्यामध्ये सुद्धा थंडच दिसून येते त्यामुळेच या छोट्या मोठ्या गोष्टींचा साधक बाधक विचार होणे ही काळाची गरज असून असे न झाल्यास माथेरान हे फक्त एक दिवसासाठीच पर्यटन म्हणून उदयास आल्यास आश्चर्य वाटायला नको. माथेरानचे पर्यटन वाचवायचे असेल तर राजकीय हेवेदवे बाजूला सारून माथेरानच्या पर्यटनावर उठलेल्या च्या विरोधात सर्वांनी एकत्र येऊन माथेरान पर्यटनाच्या विरोधात भूमिका घेणाऱ्यांना धडा शिकवण्याची गरज निर्माण झाली असून व त्यामध्ये राजकारणी असेल तर त्यांनाही माथेरानची किंमत काय आहे हे सांगण्याची आता वेळ घेऊन ठेवली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *