ठाणे : अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज सेवा संस्थेच्या वतीने ठाण्यात श्री स्वामी समर्थ महाराज प्रकटदिन सोहळा बुधवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते . १० एप्रिल २०१९, श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकटदिन. श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज सेवा संस्थेच्या वतीने व मंडळाचे संस्थापक अनिल बोर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाण्यातील पाचपखाडी नामदेववाडी येथील साईदर्शन सोसायटीमध्ये असलेल्या स्वामी समर्थ मठात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली . यानिमित्त ९,१०,११ एप्रिलला संस्थेच्या वतीने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
यामध्ये ९ एप्रिल रोजी सकाळी प्रधान मंडल स्थापना व गणेश पूजन ,सायंकाळी श्री स्वामी समर्थ भजन मंडळ यांचा सुस्वर भजन कार्यक्रम,१० एप्रिल रोजी प्रकट दिन सोहळ्यानिमित्त सकाळी भूपाळी,श्रीच्या मूर्तीवर अभिषेक,स्वामी चरित्र वाचन,स्वामी जप,स्वामीयाग पुर्णंहुती,सामुदायिक हरिपाठ, पार पडले . तर ११ एप्रिल रोजी ह.भ. प रामदास महाराज थोरात यांचे काल्याचे कीर्तन व महाप्रसाद ( भंडारा) आयोजित करण्यात आले आहे. या सर्व कार्यक्रमांचा ठाणेकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शन व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आव्हान अनिल बोर्डे यांनी केले आहे.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी यावेळी मठाचे संस्थापक अनिल बोर्डे,अध्यक्ष संगीता बोर्डे,कार्याध्यक्ष सुभाष चव्हाण,सचिव प्रदीप बैकर,खजिनदार ऍड अनघा बोर्डे-पवार, उपाध्यक्ष अपूर्वा वाघ, उपसचिव गणेश बनोटे,उपखजिनदा संतोष किंजळे.गुरुदत्त तावडे गुरुजी,वैभव पवार, शिव ॐकार सेवा संघ अध्यक्ष संजय देसाई,सचिव प्रदीप बैकर,उदय देसाई,प्रमोद पवार,राकेश रावल,कुणाल पिंगळे,संतोष पवार आदीने मेहनत घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *