भाईंदर : ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी अद्याप महायुतीचा उमेदवार जाहीर झालेला नसला तरी भाजपातर्फे संजीव नाईक यांनी उमेदवार म्हणून मीरा भाईंदर शहरात जोरदार प्रचार सुरू केला आहे. सध्या ठिकठिकाणी मेळावे घेतले जात आहेत. भाजपाचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी देखील एकनाथ शिंदे यांच्या उमेदवाराला विरोध केला असून नाईक यांच्या प्रचारासाठी कंबर कसली आहे. यामुळे महायुतीचा घटक असलेली शिवसेना कमालीची अस्वस्थ झाली आहे.
२००९ ते २०१४ पर्यंत त्यांनी संजीव नाईक यांनी या मतदार संघांचे नेतृत्व केले होते. यावरूनच आपल्याला पुन्हा उमेदवारी मिळणार असल्याची घोषणा संजीव नाईक यांनी कार्यकर्त्यापुढे केली आहे. सध्या नाईक हे भाजपाच्या मदतीने जागोजागी मेळावे घेत आहे
शिवसेनाच्या उमेदवारासाठी भाजप कार्यकर्ते काम करण्यास इच्छुक नसल्याची घोषणा माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी केली होती. त्यामुळे नाईक यांना पाठिंबा देऊन त्यासाठी गल्लीबोळ्यात फिरून प्रचार करण्यास भाजपने सुरुवात केली आहे.