पोलिसांचा लाठीचार्ज

मुंबई : अभिनेता सलमान खानच्या मुंबईतल्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी जमली आहे. ही गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केल्याची बातमी समोर आली आहे. रमजानच्या दिवशी सलमान खानची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी झाली. सलमानची एक झलक पाहण्यासाठी , सेल्फी काढण्यासाठी, त्याचे फोटो काढण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली आहे. ही गर्दी इतक्या मोठ्या प्रमाणावर होऊ लागली ती पांगवण्यासाठी अखेर पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला आहे. तसंच या लाठीचार्जचा व्हिडीओही पोस्ट केला आहे.

अभिनेता सलमान खान हा त्याच्या सिनेमांसाठी आणि बॉलिवूडमधल्या त्याच्या खास स्टाईलसाठी ओळखला जातो. सलमान खानचं वय ५५ पेक्षा जास्त असलं तरीही तो आजही स्टाईल आयकॉन आहे. सलमान खानचा टायगर थ्री चित्रपट गेल्याच वर्षी प्रदर्शित झाला होता. तसंच सलमान खानचा खास असा एक चाहता वर्ग आहे. सलमान खानचा वाढदिवस असो, ईद असो चाहते त्याच्या घराबाहेर थांबतातच. सलमानने गॅलरीत येऊन त्यांना एक झलक दाखवावी अशी त्यांची अपेक्षा असते. सलमान खानची भेट आज खासदार श्रीकांत शिंदे यांनी घेतली आणि त्याला ईदच्या शुभेच्छा दिल्या. दुसरीकडे चाहते मोठ्या प्रमाणावर त्याच्या घराबाहेर थांबले होते. ही गर्दी इतक्या मोठ्या प्रमाणावर झाली की पोलिसांना अखेर सौम्य लाठीचार्ज करुन गर्दी पांगवावी लागली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *