वारकरी संप्रदायामध्ये उल्लेखनीय काम करणार्‍या मान्यवरांचा सत्कार

ठाणे : आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित केलेल्या जांभळी नाका येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथील चैत्रनवरात्रोत्सव २०२४ भक्ती व कला महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी वारकरी संप्रदायातील किर्तनकार ह. भ. प निवृत्ती इंदुरीकर महाराज यांचे कीर्तन सादर करण्यात आले.

तसेच या कार्यक्रमामध्ये ठाणे, नवी मुंबई, मीराभाईंदर मधील वारकरी संप्रदायातील उल्लेखनीय कार्य करणार्‍या मान्यवरांचा गौरव करून सन्मानित करण्यात आले. त्यावेळी शाखाप्रमुख महेश ढोमणे, श्री संत शिरोमणी ज्ञानेश्वर माऊली सेवा मंडळचे अध्यक्ष दिनकर पाचंगे, माऊली सेवा मंडळ ठाणे चे अध्यक्ष ह. भ. प. विलास फापाळे, वारकरी संप्रदायाचे सुधीर शेलार, अशोक घोलप, किशोर साळुंखे, दादाराम जाधव, महादेव पार्टे, गणेश पाटील, वासुदेव पांचाळ, माजी परिवहन समिती सदस्य राजेंद्र महाडिक, तसेच ठाणे, नवी मुंबई, मीरा-भाईंदर या शहरातील वारकरी संप्रदायामधील वारकरी व येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सत्कार मूर्ती – ठाण्यातील ह. भ. प. चंद्रकांत क्षीरसागर, ह. भ. प. गोकुळ महाराज बुचडे, ह. भ. प. वासुदेव भिकाजी पांचाळ, ह. भ. प. अजित निकम, ह. भ. प. पुंडलिक खंडू मोरे, ह. भ. प. रेखा काशिनाथ कंटे, ह. भ. प. गोरक्षनाथ कृष्णा फडतरे, ह. भ. प.शोभाताई इंळवे, ह. भ. प. अनिताताई चुंबळे नवी मुंबई येथील ह. भ. प. हनुमंत महाराज गोळे, ह. भ. प. सचिन महाराज विराळे, ह. भ. प. वसंत सखाराम मिस्त्री, ह. भ. प. सुभाष कोंडीबा आरोटे, ह. भ. प.रमेश महाराज दळवी, ह. भ. प. सटवा यादव तोडारे, ह. भ. प. जयेश शंकर म्हात्रे  मीरा भाईंदर ह. भ. प. अर्चना कृष्णा पारेकर, ह. भ. प. अलका राजेंद्र दुसगे, ह. भ. प. सुमित्रा हरिभाऊ मुळे, ह. भ. प. भागीरथी बद्रीनाथ बहीर, ह. भ. प. वनिता वचीष्ट पौळ  इत्यादी मान्यवरांचा किर्तनकार ह. भ. प निवृत्ती इंदुरीकर महाराज यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

टिप – आज गुरुवार दि. ११ एप्रिल २०२४ रोजी सायं. ७:०० वा. आंतरराष्ट्रीय लोक गायक रविन्द्र सिंह ज्योति, व लोकगायक मुकेश त्रिपाठी आणि लोकगायक रागिनी प्रजापती यांचा कार्यक्रम तसेच उत्तर भारतीय समाजातील मान्यवरांचा सत्कार समारंभ आयोजित केला आहे. तरी कृपया आपण सर्व पत्रकार बंधू व छायाचित्रकार आणि कॅमेरामन यांनी उपस्थित रहावे हि नम्र विनंती. स्थळ :- श्री. छत्रपती शिवाजी महाराज मैदान, जांभळी नाका, ठाणे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *