ठाणे : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर १४६ ओवळा माजिवडा विधानसभाक्षेत्र जनजागृती कार्यक्रमांनी दुमदुमले. येथील लोढा पॅराडाईज महिला संघ व हाऊसिंग फेडरेशन माजिवडा मानपाडा प्रभाग ठाणे येथे नोडल अधिकारी श्री.सुनिल यादव व नायब तहसिलदार तथा नोडल अधिकारी स्मितल यादव यांच्या मार्गदर्शनखाली स्वीप पथकाचे श्री.अशोक भोये व सर्व स्वीप कर्मचारी यांनी गुढीपाडव्याच्या कार्यक्रमात मतदारांमध्ये जनजागृती करण्याबाबत सर्व महिला व नागरिकांना 100% मतदान करण्याचे आवाहन केले.
यावेळी नोडल अधिकारी श्री.सुनिल यादव यांनी मनोगत व्यक्त करताना महिला वर्ग, जेष्ठ नागरिक व नवमतदार तसेच तरुण पीढीने जास्तीत जास्त मतदान करावे,असे आवाहन केले.
