नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सामाजिक समतेचे अग्रणी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीदिनानिमित्त महापालिका मुख्यालयातील ॲम्फिथिएटर येथे नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या शुभहस्ते प्रतिमेस पुष्पमालिका अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्री. सुनिल पवार, प्रशासन विभागाचे उपआयुक्त श्री. शरद पवार, शहर अभियंता श्री. संजय देसाई, समाजविकास विभागाचे उपआयुक्त श्री. किसनराव पलांडे, परिमंडळ 2 उपआयुक्त श्री. चंद्रकांत तायडे, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सहा. आयुक्त श्री. जयंत जावडेकर, स्वच्छता अधिकारी श्री. राजेंद्र इंगळे आणि इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *