पनवेल माथेरान पर्यायी मार्ग लाल फीतीमध्ये अडकला
माथेरान :माथेरान पर्यटन नगरीला भेट देण्याकरिता सध्या नेरळ ते माथेरान हा एकमेव घाट रस्ता उपलब्ध आहे त्याचबरोबर नेरळ माथेरान मिनी ट्रेनच्या मर्यादित सेवा सुरू आहेत माथेरान करिता पनवेल मार्गे पर्यायी रस्ता उपलब्ध झाल्यास माथेरानची पर्यटन वाढणार असून पनवेल येथे होणाऱ्या विमानतळाचा फायदा माथेरान पर्यटन नगरीला निश्चितच होणार आहे त्यामुळेच पनवेल धोदानी माथेरान हा मार्ग व्हावा अशी मागणी माथेरान मधून जोर धरू लागली आहे.
यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते १९६५ साली पनवेल धोधानी माथेरान या रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले होते त्यानुसार रस्त्याचे कामे सुरू झाले व जवळजवळ 25 ते 30 किलोमीटर काम होऊन हा रस्ता धोदानी पर्यंत येऊन ठेपला होता व फक्त तीन ते चार किलोमीटर घाट मार्गाचे काम पूर्ण केल्यास हा रस्ता माथेरान पर्यंत येणार होता परंतु अचानक काही काडी फिरली व धोदानी ते माथेरान हे काम बंद करण्यात आले त्यानंतर फेन्युकुलर रेल्वे धोधानी माथेरान या दरम्यान मंजुरी करण्यात आला होता यावेळीही पुन्हा काडी फिरली व हा प्रकल्प बंद करण्यात आला परंतु सध्या पनवेलचे आमदार श्री प्रशांत दादा ठाकूर यांनी हा मार्ग माथेरान साठी उपलब्ध व्हावा याकरिता प्रयत्न सुरू केले असून त्यासाठी लागणाऱ्या परवानग्या करता पाठपुरावा सुरू केला आहे त्यामुळे माथेरानला लवकरच पर्यायी रस्ता मिळण्याची शक्यता निर्माण झाली असून हा रस्ता सुरू झाल्यास माथेरानचे पर्यटन भरणार आहे.
धोदानी ते माथेरान फक्त वीस मिनिटांमध्ये पर्यटक माथेरानमध्ये येऊ शकतो. नवीन विमानतळामुळे माथेरान पर्यटन क्षेत्र अधिक बहरू शकते.मुंबई पुणे द्रुगती मार्गशी माथेरान जोडले गेल्यास पर्यटकांचा एक तास प्रवास वेळ वाचू शकतो. नव्याने होत असलेल्या नाशिक क्यारिदोर मार्गाशी माथेरान थेट जोडले जाणार आहे नाशिक पुणे मुंबई ठाणे प्रवास जलद होणार. एकच मार्ग असल्याने वाहन कोंडी समस्या मोठी आहे. अनेकवेळा पावसाळ्यात घाट रस्ता बंद झाल्यास माथेरान शी संपर्क तुटतो.
