महाप्रसाद भंडाऱ्याचे आयोजन

ठाणे दि : श्री अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज प्रकटदिन महाप्रसाद भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. १० एप्रिल २०१९ श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकटदिन श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज सेवा संस्थेच्या वतीने व मंडळाचे संस्थापक अनिल बोर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाण्यातील पाचपखाडी नामदेववाडी येथील साईदर्शन सोसायटी मध्ये असलेल्या स्वामी समर्थ मठात  मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली . यानिमित्त ९,१०,११ एप्रिल २०२४ रोजी संस्थेच्या वतीने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.गुरुवार ११ एप्रिल रोजी ह.भ. प रामदास महाराज थोरात यांचे काल्याचे कीर्तन व त्यानंतर महाप्रसाद ( भंडारा) आयोजित करण्यात आला होता याचा स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी यावेळी मठाचे संस्थापक अनिल बोर्डे,अध्यक्ष संगीता बोर्डे,कार्याध्यक्ष सुभाष चव्हाण,सचिव प्रदीप बैकर,खजिनदार ऍड अनघा बोर्डे-पवार, उपाध्यक्ष अपूर्वा वाघ,उपसचिव गणेश बनोटे,उपखजिनदा संतोष किंजळे,वैभव पवार, शिव ॐकार सेवा संघ अध्यक्ष संजय देसाई,सचिव प्रदीप बैकर,उदय देसाई,कुणाल पिंगळे,संतोष पवार आदींसह प्रभागातील स्थानिक नागरिकांनी मेहनत घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *