उल्हासनगर : युथ आयकॉन ओमी कालानी यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त महागड्या वस्तूंऐवजी नोटबुक्स गिफ्ट देण्याचे आवाहन उल्हासनगरातील हितचिंतकांना केले होते. या आवाहनाला प्रतिसाद मिळाला असून ओमी यांना तब्बल दिड लाख नोटबुक्स गिफ्टमध्ये मिळाली आहेत.टीम ओमी कालानी यांच्या वतीने हे नोटबुक्स गरीब-अनाथ विद्यार्थ्यांना वाटण्यात येणार आहेत.
लोकसभेत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासाठी प्रचारार्थ उतरणार आणि येणाऱ्या विधानसभेत आमदारकीची निवडणूक लढवणार अशी कमिटमेंट ओमी कालानी यांनी केलेली आहे. अशातच 11 एप्रिल रोजी असणाऱ्या वाढदिवसाला महागड्या गिफ्ट ऐवजी नोटबुक्स गिफ्ट देण्याचे आवाहन ओमी कालानी यांनी केले होते. त्यास हितचिंतकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला आहे. अनाथ मुलांच्या शाळांत आणि विटभट्टीवर काम करणाऱ्या व आदिवासी पाड्यात राहणाऱ्या गोरगरिबांच्या मुलांना हे नोटबुक्स वाटण्यासाठी टीम ओमी कालानी जाणार आहे.
दरम्यान कालानी महालात ओमी कालानी यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कल्याण लोकसभा उमेदवार वैशाली दरेकर, भिवंडी लोकसभेचे उमेदवार सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अरुण आशान, महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी, पदाधिकारी जमनू पुरस्वानी, प्रकाश माखीजा, चार्ली पारवानी, उबाठाचे मुख्य पदाधिकारी धनंजय बोडारे, राजेश वानखेडे, दिलीप मिश्रा आदी विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी माजी आमदार पप्पू कलानी, राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षा पंचम कालानी, टीम ओमी कालानीचे कमलेश निकम, मनोज लासी, सुमित चक्रवर्ती, अजित माखीजानी, पितू राजवानी, दिनेश लेहरानी, शिवाजी रगडे, जमिल खान, मोहित पेसवानी, सुंदर मुदलियार आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.