उद्धव ठाकरेंकडून मोदींचा हिशेब चुकता

पालघर :  शिवसेनाला नकली म्हणता ती काय तुमची बोगस डिग्री आहे का? माझ्या मर्दमराठा मावळ्यांच्या घामातून उभी राहीलेली शंभरनंबरी असली शिवसेना आहे. नकलीचा सोस तुम्हाला , तुमची डीग्री नकली. तुमची गॅरंटी नकली अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींचा हिशेब चुकता केला.

पालघरमध्ये जाहीर सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी मोदी आणि अमित शाह यांनी केलेल्या टीकेवर जोरदार प्रहार केला. ते म्हणाले की, हा भाडखाऊ जनता पक्ष आहे, यांना गाडायचं असेल तर आत्ताच गाडा, यांची प्रवृत्ती म्हणजे जो यांना देणार साथ त्याचा हे करणार घात अशी असल्याचे ठाकरे म्हणाले.

ठाकरे म्हणाले की, इकडे फणा काढून बसतात आणि तिकडे चीनकडे शेपूट घालून फिरतात. तुम्हाला देशात सरकार पाहिजे ना हो की नाही मग तुम्हाला मोदी सरकार पाहिजे की भारत सरकार पाहिजे पण ते तर ‘मोदी सरकार’ची जाहिरात करतात. भारत माता ही माझी माता आहे असे सांगून ठाकरे पुढे म्हणाले मोदीजी तुमचं नाव तुमच्या दाराच्या पाठीवर लावा माझ्या देशाच्या पाठीवरती तुम्हाला लावता येणार नाही, माझ्या देशाच्या सरकारवरती मोदी नाव पुन्हा लावता कामा नये, येता कामा नये.

उद्धव ठाकरे यांनी केलेले एकतरी काम दाखवा असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. हा धागा पकडून ठाकरे यांनी मोदींना आव्हान दिले. एका व्यासपीठावर येऊन तुम्ही तुमच्या दहा वर्षाचा हिशोब मांडा, मी माझ्या अडीच वर्षाचा मांडतो आणि लोकांवर सोडा मग खेळ नाही करायचा. लोकांना निर्णय घेऊ द्या माझी तयारी आहे, एक तर लोक तुम्हाला घरी पाठवतील नाही, तर लोक मला घरी पाठवतील. मला जनतेचा फैसला मला मंजूर आहे. त्यांनी सांगितले की, ईडी, इन्कम टॅक्स वाले यांचे घरघडी आहेत अशा पद्धतीने आपल्या कार्यकर्त्यांच्या मागे लावत आहेत. माझा कार्यकर्तांवर तुम्ही खोटे आरोप लावता, त्याच कंपनीचा मालक आहे तो मिंध्यांकडे गेला तो मोकाट आहे याची आठवणही ठाकरे यांनी यावेळी करून दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *